आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची गरज:नर्सरीमध्ये पुरुष शिक्षक मिळत नाहीत, अध्यापन देखभालीचे काम वाटते

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगात एकीकडे महिला-पुरुष समानतेवर भर दिला जात आहे. परंतु ब्रिटनमध्ये मात्र मुलांना शिकवण्यासाठी पुरुष शिक्षक मिळत नसल्याचे चित्र आहे. ही समस्या प्री-स्कूलमध्ये दिसून येते. तेथे एकूण शिक्षकांपैकी केवळ ३ टक्के पुरुष शिक्षक आहेत. तेथील पुरुष शिक्षक लहान मुलांना शिकवण्याचा अभिमान बाळगण्याऐवजी ते देखभालीचे काम असल्याचे त्यांना वाटते. त्यामुळे नर्सरी शाळांमध्ये जाणे टाळू लागले आहेत. पुरुष शिक्षकांच्या अशा वागण्यामुळे सरकार तसेच तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. प्री-स्कूलमधील पुरुषांची संख्या वाढली नाही तर लहान मुलांचे संगोपन केवळ महिलांची जबाबदारी नाही, ही धारणा देखील बदलणे कठीण होईल, असे तज्ज्ञांना वाटू लागले आहे. लहान वर्गात मुलांना शिकवण्यासाठी पुरुष शिक्षक वर्गात असणे हे सकारात्मक असल्याचे ब्रिटनच्या सरकारला वाटते. परंतु वेतन कमी असणे, समाजात स्वीकार्हता नसल्याने पुरुष उत्सुक नाहीत. २०२० मधील एका पाहणीनुसार पुरुष शिक्षक लहान वर्गाकडे वळले तरी शिक्षिकांच्या तुलनेत लवकर नोकरी सोडतात.

कठीण कामांमध्ये महिलांची पुरुषांशी बरोबरी
भलेही पुरुष शिक्षक मिळत नसले तरीही कठीण व्यवसायात महिला पुरुषांची बरोबरी करत आहेत. २००२ नंतर इंग्लंडच्या अग्निशमन दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण १.७ टक्क्यांहून वाढून ७.५ टक्क्यांवर गेले. देशात एक तृतीयांश पोलिस अधिकारी महिला आहेत.

बातम्या आणखी आहेत...