आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:पाकिस्तानात ईशनिंदेच्या आरोपीची जमावाकडून निर्घृण हत्या, माजी PM इम्रान खान यांच्या रॅलीतील थरार; पाहा VIDEO

पेशावर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे ईशनिंदा केल्याप्रकरणी जमावाने एका व्यक्तीची हत्या केली. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या रॅलीत शनिवारी मर्दान जिल्ह्यात ही घटना घडली. यावेळी इम्रान रॅलीला हजर नव्हते.

'द फ्रायडे टाइम्स'च्या वृत्तानुसार, 40 वर्षीय मौलाना निगार आलम यांनी रॅलीमध्ये पीटीआय नेते इम्रान खान यांची तुलना पैगंबरांशी केली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात जमाव मौलाना निगार आलम यांच्यावर दगडफेक करताना दिसत आहे. आलम यांच्या मृत्यूनंतर जमाव त्यांचा मृतदेह ओढतानाही दिसत आहेत.

फेब्रुवारीत ईशनिंदेच्या आरोपीची पोलिस ठाण्याबाहेर झाली होती हत्या
पाकमध्ये ईशनिंदा केल्याप्रकरणी जमावाने एखाद्याची हत्या करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी गत फेब्रुवारी महिन्यात ईशनिंदेचा आरोप असलेल्या एका व्यक्तीची जमावाने पोलिस ठाण्यातून ओढून काढत हत्या केली होती. पंजाब प्रांतातील नानकाना साहिब जिल्ह्यात ही घटना घडली होती. पोलिस ठाण्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी जीवाच्या भीतीने पळ काढला होता.

या व्हिडिओमध्ये जमाव पोलिस स्टेशनच्या मुख्य गेटवर चढताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये जमाव पोलिस स्टेशनच्या मुख्य गेटवर चढताना दिसत आहे.

डिसेंबरमध्ये श्रीलंकन नागरिकाची हत्या
पाकिस्तानमध्ये ईशनिंदेचे अतिशय कडक कायदे आहेत. यामुळे अनेकांना ठेचून मारले जाते. डिसेंबर 2021 मध्ये, एक श्रीलंकन फॅक्टरी मॅनेजरची अशीच मारहाण करून हत्या केली होती. त्याला जमावाने प्रथम मारहाण केली. त्यानंतर पेटवून दिले.

श्रीलंकन मॅनेजरची डिसेंबर 2021 मध्ये सियालकोटमध्ये ईशनिंदेप्रकरणी जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती.
श्रीलंकन मॅनेजरची डिसेंबर 2021 मध्ये सियालकोटमध्ये ईशनिंदेप्रकरणी जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती.

तत्पूर्वी, एप्रिल 2017 मध्येही मिशाल खान यांना मर्दान विद्यापीठात त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. 2012 मध्ये, बहावलपूरजवळ एका मतिमंद व्यक्तीला जमावाने पोलिस ठाण्यातून खेचून नेऊन हत्या केली होती. तसेच दादो येथेही जमावाने पोलिस ठाण्यात घुसून ईशनिंदा करणाऱ्या आरोपीला जिवंत जाळले होते.

या बातम्या पण वाचा...

पाकिस्तानात चीनी नागरिकावर ईशनिंदेचा आरोप:जमावाचा छावणीला घेराव, पोलिसांनी वाचवले

पाकिस्तानमध्ये आता एका चिनी नागरिकावर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संतप्त लोकांनी कोहिस्तानमधील चिनी नागरिकांच्या निवासी छावणीला घेराव घातला. पोलिसांनी योग्य वेळी दाखल होत चीनच्या सर्व नागरिकांना वाचवले.

ज्या व्यक्तीवर ईशनिंदेचा आरोप आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. 3 डिसेंबर 2021 रोजीही, सियालकोटमध्ये एका श्रीलंकन ​​फॅक्टरी मॅनेजरला जमावाने बेदम मारहाण केली होती. नंतर त्याला कारखान्याबाहेर ओढून जिवंत जाळण्यात आले. त्यावेळी इम्रान खान पंतप्रधान होते. येथे वाचा संपूर्ण बातमी...

हिंदू-मुस्लिम एकत्र साजरी करत होते होळी, इस्लामिक कट्टरतावादी चिडले:पाकिस्तानमध्ये हिंदू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामागे IJT

पाकिस्तानच्या लाहोरमधील पंजाब विद्यापीठात 6 आणि 7 मार्च रोजी होळी साजरी करण्यासाठी जमलेल्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 30 विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांमध्ये मुस्लिमांचा समावेश नाही. या दोन्ही हल्ल्यांमागे पाकिस्तानच्या कट्टरवादी विद्यार्थी संघटनेचे इस्लामी जमियत-ए-तलबा (आयजेटी) नाव समोर आले आहे.

ही संघटना कट्टर वहाबी विचारधारा असलेल्या जमात-ए-इस्लामीची विद्यार्थी शाखा आहे. 13 एप्रिल 2017 रोजी मर्दान प्रांतातील अब्दुल वली खान विद्यापीठात मशाल खानच्या लिंचिंगमध्येही त्याचे नाव आले होते. झिया-उल-हक यांच्या हुकूमशाहीच्या काळातही आयजेटी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर त्याच्याशी संबंधित विद्यार्थी झियाला विरोध करणाऱ्यांना जाहीरपणे मारहाण करायचे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन डे ऐवजी 'हया डे' साजरा करण्याची मोहीम सुरू केली. येथे वाचा संपूर्ण बातमी...