आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Finding ANA Viral Video Latest News, Spain Man Travels To Bolivia To Meet His Nanny, Latest And Update News 

45 वर्षानंतर दाईची भेट घेतली VIDEO:स्पेनच्या जॉन्सननीं 8 हजार किमी. प्रवास करून शोधले; म्हणाले- तुम्ही मला सांभाळले, अन् दोघेही रडू लागले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांनी तुमच्या लहानपणी तुमच्यावर प्रेम केले ते लोक नेहमी तुमच्या मनात घरात करून बसतात. असाच काहीसा प्रकार स्पेनमधील रहिवासी हुआनिटो जॉन्सनसोबत घडला. जॉन्सनला लहानपणी ज्या बाईने अंगाखाद्यावर खेळवले. लाड पुरवले. डोक्यावरून मायेचा हात फिरवला. त्या दाईच्या भेटीसाठी ज़ॉन्सन यांनी तब्बल आठ हजार किलोमीटर प्रवास करून भेट घेतली आहे. ही भेट तब्बल 45 वर्षांनी झाल्याने दोघांच्या भेटीत आनंदच आनंद होता. दाईला भेटण्यासाठी जॉन्सन याने स्पेन ते बोलिव्हिया असा तब्बल 8 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.

या संपूर्ण प्रवासाचा आणि दाईला भेटण्याचा व्हिडिओ जॉन्सन यांनी सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ पाहून सगळेच लोक भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. जॉन्सन यांनी ट्विट करताना म्हटले की, गुडन्यूज मुव्हमेंट असा शब्द उल्लेख केला आहे.

जेव्हा हुआनिटो जॉन्सन यांनी अ‌ॅनाला त्याची ओळख सांगितली. तेव्हा तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
जेव्हा हुआनिटो जॉन्सन यांनी अ‌ॅनाला त्याची ओळख सांगितली. तेव्हा तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

हुआनिटो जॉन्सला ओळखल्यानंतर अ‌ॅना भावूक झाल्या
पेशाने पाद्री असलेला जॉन्सन जेव्हा त्याच्या थकलेल्या दाई अ‌ॅना यांच्या घरी पोहोचला. तेव्हा ती त्याला लगेच ओळखत नाही. अ‌ॅनाला पाहून हुआनिटो म्हणतो - हॅलो, तुम्ही मला ओळखले की नाही, हे मला माहित नाही. मी हुआनिटो जॉन्सन आहे. जेव्हा त्याने त्याची ओळख सांगितली तेव्हा अ‌ॅना यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी जॉन्सनला मिठी मारली. अ‌ॅना यांना विश्वासच बसत नव्हता की, तब्बल 45 वर्षांनंतर तिचा पालक मुलगा तिला भेटायला आला आहे. त्यानंतर हुआनिटो जॉन्सन त्यांना त्या दोघांची छायाचित्रे दाखवतो. दोघेही बराच वेळ बोलतात आणि एकत्र जेवण करतात.

हुआनिटो अ‌ॅनाला त्याचा बालपणीचा फोटो अल्बम दाखवतो, ज्यामध्ये अ‌ॅना यांच्या सोबतच्या आठवणी जागृत करित आहे.
हुआनिटो अ‌ॅनाला त्याचा बालपणीचा फोटो अल्बम दाखवतो, ज्यामध्ये अ‌ॅना यांच्या सोबतच्या आठवणी जागृत करित आहे.

6 महिन्यांपासून ते 6 वर्षांपर्यंत हुआनिटोला सांभाळले जॉन्सनचा जन्म स्पेनमध्ये झाला. त्यानंतर जॉन्सन हे सहा महिन्यांच्या असताना त्याचे आईवडील हे बोलिव्हियाला घेऊन आले. त्यानंतर अ‌ॅना त्यांची दाई बनली होती. सहा महिन्यांपासून ते सहा वर्षांचे होईपर्यंत जॉन्सनला सांभाळले, त्यावेळी अ‌ॅना 31 वर्षांच्या होत्या. स्वतःच्या मुलाप्रमाणे जॉन्सनची काळजी अ‌ॅना यांनी घेतली. त्यानंततर हुआनिटो यांचे कुटुंब पुन्हा स्पेनला गेले. यानंतर हुआनिटोचे कुटुंब स्पेनला परतले. परंतू अ‌ॅनाचे प्रेम आणि काळजी हुआनिटो जॉन्सच्या मनात कायम राहीली.

काही महिन्यांपूर्वी हुआनिटोने अ‌ॅना यांना शोधण्यास सुरुवात केली. अ‌ॅना यांच्यासाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी 'अ हेल्प फॉर अ‌ॅना' नावाचे पेजही तयार केले. जेव्हा त्यांना अ‌ॅना यांचा पत्ता सापडतो तेव्हा ते स्पेनहून बोलिव्हियाला जातात जिथे अ‌ॅना त्यांच्यामुलासमवेत राहतात. त्यांचे वय आता 78 वर्षे आहे.

जेव्हा हुआनिटो हे 6 महिन्यांचे होते. तेव्हा अ‌ॅना यांनी खूप काळजी घेतली. जे हुआनिटो कधीही विसरणार नाहीत.
जेव्हा हुआनिटो हे 6 महिन्यांचे होते. तेव्हा अ‌ॅना यांनी खूप काळजी घेतली. जे हुआनिटो कधीही विसरणार नाहीत.

अ‌ॅना म्हणाल्या- हुआनिटो जॉन्सन ही माझ्यासाठी देवाची देणगी
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अ‌ॅना यांच्याशी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने सांगितले की, एवढ्या वर्षांनी हुआनिटोला पाहिल्यानंतर मी त्याला ओळखू शकलो नाही. पण तो माझा कोणीतरी आहे. हे मनातून वाटत होते. जेव्हा मी 6 महिन्यांच्या हुआनिटोला भेटले तेव्हा मी माझी मुले गमावली होती. म्हणून त्याला भेटणे ही देवाची भेट होती. हुआनिटो आणि माझे नातेच वेगळे आहे. तो मोठा झाल्यावर माझ्या मागे धावायचा. लहानपणी मी त्याला 'माय स्वीडिश चोलो' म्हणायचे.

व्हिडीओच्या शेवटी हुआनिटो म्हणाला की, अ‌ॅना मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू नेहमी माझ्या हृदयात आहेस. अ‌ॅना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर चार दशकानंतर मी त्यांचे प्रेम आपुलकीबद्दल आभार मानायला गेलो होतो. तिचे प्रेम माझ्यापासून कधीच वेगळे झाले नाही. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. आमची भेट होणे ही आयुष्यातील खूप खास गोष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...