आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास:ज्वालामुखीची राख, चुना अन् अॅल्युमिनियमने काँक्रीटची निर्मिती

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रोमन साम्राज्य आपले रस्ते आणि उत्कृष्ट इमारतींसाठी जगभर ओळखले जाते. त्यावेळच्या इमारती अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असून त्या सध्या २ हजार वर्षांनंतरही डौलाने उभ्या आहेत.

आजही त्यावेळी तयार केलेल्या जलवाहिन्यांद्वारे रोम शहराला पाणी पुरवठा केला जातो. आधुनिक जगात विविध मोठ्या इमारतींची काही दशकांत दुरुस्ती करावी लागते. त्या काही शतकांपेक्षा जास्त तग धरू शकत नाहीत. मेसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी रोमन साम्राज्यातील अभियांत्रिकी आणि त्या वेळच्या इमारतींत वापरलेल्या सामग्रीचा शोध घेतला.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, रोमन आपल्या इमारतींत ज्वालामुखीच्या राखेचा वापर करत होते. याची ते इटलीच्या पेजौली भागातून संपूर्ण रोमन साम्राज्याला पुरवठा करत होते.यासोबत कॅल्शियसाठी चूना मिसळला जात होता. तसेच सिलिकॉन आणि अॅल्युमिनियमही मिसळले जात होते. शास्त्रज्ञांनी यासाठी इटलीचे पुरातत्त्व स्थळ प्रिव्हेरनम येथून नमुने गोळा केले होते. ज्या इमारतींमध्ये चुन्याचा वापर झाला होता ते काळानुरूप कमकुवत पडण्याऐवजी आणखी बळकट झाल्या आहेत.

एसआयटीमध्ये सिव्हिल अँड एनव्हार्यमेंटल इंजीनिअरिंगचे प्रा. अॅडमीर मझेक म्हणाले, रोमन साम्राज्यात ज्या वस्तूंपासून काँक्रिट केले जात होते, त्याचा आधुनिक काँक्रिटमध्ये वापर केला जात नाही. एवढेच नव्हे तर एवढी मजबुती सध्याच्या काँक्रिटमध्येच दिसत नाही.

रोमन अभियंते काँक्रीटची पेस्ट बनवत होते
रोमन साम्राज्यातील अभियंते काँक्रिट पाण्यासोबत मिसळून पेस्ट बनवत होते. त्यासाठी ते उच्च-रिझोल्यूशन मल्टीस्केल इमेजिंग व रासायनिक मानचित्रण तंत्रज्ञान वापरत होते.त्यास स्लेकिंग म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...