आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी सत्तेचे दोन महिने:तालिबानने थकबाकी न भरल्याने काबूलसह अनेक शहरे अंधारात, संपत्ती विकण्याची वेळ

काबूल5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात राजधानी काबूल, कंदहार व उत्तर बघलानसह अनेक प्रांत वीज कपातीमुळे अंधारात आहेत. त्यामागे उझबेकिस्तानमधून होणारा वीज पुरवठा खंडीत होणे हे कारण आहे. अफगाणिस्तानची सरकारी वीज कंपनी द अफगाणिस्तान ब्रेशना शेरकतवर (डीएबीएस) अनेक मध्य आशियाई देशांची वीज देयकाची थकबाकी आहे. तालिबानने अद्यापही मध्य आशियातील वीज पुरवठादारांना थकबाकीची रक्कम दिलेली नाही. त्याशिवाय पुरवठादारांनी ग्राहकांकडून पैसा वसुलीसाठी नवी रचना तयार केली आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच सुमारे ६.२ कोटी डॉलरच्या (सुमारे ४७० कोटी रुपये) वीज बिलाचे देयके भरण्यासाठी डीएबीएस सरकारी अधिकाऱ्यांची संपत्ती विकण्याच्या तयारीत आहे. तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानमध्ये खाण्या-पिण्याच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. अफगाण वीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार उत्तर बघलान प्रांतात तांत्रिक समस्येमुळे वीज पुरवठ्यात अडथळा आला आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल. त्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे, असे कंपनीने जाहीर केले आहे.

दहशतवादी हल्ले वाढले : २६ ऑगस्टला काबूल विमानतळाबाहेर आत्मघातकी हल्ला झाला. त्यात १३ अमेरिकींसह १७० लोकांचा मृत्यू झाला. ३ ऑक्टोबरला जबीहुल्ला मुजाहिदच्या आईवरील श्रद्धांजली सभेवर हल्ला. त्यात पाच ठार झाले.

दोन महिन्यांत बदल : २२ लाख विद्यार्थी शाळेतून बाहेर पडले. महिला-मुलींचे जगणे कठीण झाले. काबूलसह देशभरातील शाळा सुरू झाल्या. परंतु फक्त मुलांना शाळेत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय ब्यूटी पार्लर, सलूनची दुकाने बंद झाली.

महिलांचा संघर्ष : महिला घरातून बाजारातही जाऊ शकत नाहीत. तालिबानी मुलींना पळवून नेतील, अशी लोकांमध्ये दहशत पसरली आहे. महिलांनीही तालिबानच्या विरोधात आघाडी उघडली आहे. ७० ते ८० महिला अधिकारी व सत्तेत भागीदारी देण्याची मागणी करत आहेत.मुलींना खेळ खेळण्यावर बंदी आहे. देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यावर संकट. देशात संगीतावर बंदी.

बातम्या आणखी आहेत...