आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • Many Countries Have Hidden Deaths Figures From Corona; 5 Times In Russia, 2 Times More Deaths Occurred In India And Mexico

मृतांची आकडेवारी:अनेक देशांनी कोरोना मृतांचा आकडा लपवला; रशियात 5, तर भारत आणि मेक्सिकोमध्ये 2 पट जास्त मृत्यू

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स इंस्टीट्यूटचा दावा

कोरोना महामारी येऊन एक वर्षा लोटले आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, पण यातील अनेकांच्या मृत्यूची सरकारी आकडेवारीत नोंदच झालेली नाही. असे यामुळे, कारण अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इंस्टीट्यूटच्या विश्लेषणात करण्यात आला आहे. यात सांगितल्यानुसार, रशियात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी सरकारी आकडेवारीपेक्षा 5 पट जास्त आहे. तसेच, भारत आणि मेक्सिकोमध्येही सरकारी आकडेवारीपेक्षा 2 पट जास्त मृत्यू झाले आहेत. तर संपूर्ण, जगात सरकारी आकडेवारीपेक्षा 113% जास्त मृत्यू झाले आहेत.

अभ्यासकांनी आपला दावा सिद्ध करण्यासाठी काही बाजू मांडल्या आहेत

 • कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कमी सांगितली, खासकरुन त्या भागात, जिथे मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या नाहीत.
 • कोरोना रुग्णांसाठी आरोग्य व्यवस्थेचा योग्य वापर झाला नाही.
 • चिंता आणि नैराश्येतून बर्‍याच रुग्णांनी आत्महत्या केल्याचे ठाम पुरावे मिळाले, पण यांची कोरोना मृतांमध्ये नोंद नाही.
 • इन्फ्लूएंजा, निमोनिया किंवा श्वासामुळे मृत्यू कमी झाले, पण संक्रमणामुळे वाढले.
 • हृदय रोग किंवा श्वसनासंबंधी आजारामुळे मृत्यू झाले, पण यांची सरकारी आकडेवारीत नोंद नाही.
 • घरी किंवा हॉस्पिटलच्या बाहेर झालेल्या मृत्यूची सरकारी आकड्यात नोंद झाली नाही.
 • चाचण्या कमी केल्यानेही अनेक मृत्यू झाले, त्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेच नाही.
बातम्या आणखी आहेत...