आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा लॉकडाऊन:अचानक वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियाचे अनेक भाग लॉकडाऊन दिशेने

वॉशिंग्टन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलिया : मेलबर्नच्या 32 उपनगरांत पुन्हा लॉकडाऊन

काेरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे अमेरिकेतील डझनावर राज्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची चिन्हे आहेत. अॅरिझोनामध्ये सरकारने बार, जिम, सिनेमागृह, वॉटर पार्क ३० दिवसांसाठी पुन्हा बंद करून टाकले आहेत.

येथे सार्वजनिक कार्यक्रमांतही ५० हून जास्त लोकांना सहभागी होत येणार नाही. गव्हर्नर डोग डाॅकी यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे. अॅरिझोनामध्ये आतापर्यंत ७६ हजार ९८७ रुग्ण आढळून आले आहेत, तर १ हजार ५८८ जणांचे प्राण गेले आहेत. येथे सात दिवसांपासून सातत्याने ३ हजारांहून जास्त नवे रुग्ण येत आहेत. गेल्या आठवड्यात याच आशयाचे काही व्हिडिआे समोर आले होते. त्यात अनेक वेळा लोक बार, रेस्तराँमध्ये विनामास्क दिसून आले होते. त्यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. फ्लोरिडानेदेखील आपल्या दक्षिणेकडील सागरकिनारी ४ जुलै भटकंतीवर बंदी घातली आहे. सूत्रांच्या मते, सरकार हा निर्णय पुढेही लागू करण्याची शक्यता आहे. फ्लोरिडामध्ये आतापर्यंत १ लाख ४६ हजार ३४१ रुग्ण आढळून आले. ३ हजार ४४७ जणांचा मृत्यू झाला. टेनेसीमध्ये आणीबाणी २९ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. जॉर्जियात लॉकडाऊन दोन आठवडे वाढवण्याची योजना आहे. न्यूयॉर्क, न्यूजर्सीत रेस्तराँमध्ये खाण्यापिण्यावर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे.

ऑस्ट्रेलिया : मेलबर्नच्या 32 उपनगरांत पुन्हा लॉकडाऊन

मेलबर्न । ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील ३२ उपनगरांत पुन्हा एका महिन्यासाठी लॉकडाऊन सुरू झाला. मेलबर्न व्हिक्टोरिया राज्याचा भाग आहे. व्हिक्टोरियात ७१ नवे रुग्ण आढळल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. व्हिक्टोरियात आतापर्यंत २१०० रुग्ण आढळले. व्हिक्टोरियाचे प्रशासक डॅनियल अँड्रयू म्हणाले, आंतरराष्ट्रीय उड्डाणांना दोन आठवडे मेलबर्नमध्ये प्रवेश करण्यास मनाई असेल. क्वीन्सलँडने व्हिक्टोरियाहून येणाऱ्या लोकांसाठी १४ दिवसांचा क्वाॅरंटाइन अनिवार्य केला आहे.

ब्रिटन : आढळलेल्या एकूण रुग्णांत लिसेस्टरचे १० टक्के

लंडन । ब्रिटनमध्ये लिसेस्टरमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू झाला. १५ जूनपासून अत्यावश्यक दुकाने सुरू होती. परंतु आता मंगळवारपासून तीदेखील बंद झाली आहेत. १ जूनपासून शाळा सुरू झाल्या होत्या. शाळाही आता बंद असतील. ब्रिटनमध्ये पब, रेस्तराँ, सिनेमा, धार्मिक स्थळ ४ जुलैपासून सुरू होतील. परंतु लिसेस्टर ठप्प असेल. लिसेस्टरमध्ये १ हजाराहून जास्त रुग्ण आहेत. २७१ जणांचा येथे मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात देशात १० टक्के रुग्ण याच भागात आढळले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser