आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:बायडेनशी मतभेदांमुळे कमला हॅरिस यांचेे राजकीय भवितव्य संकटात, विवादांच्या कार्यकाळाचे 1 वर्ष

न्यूयॉर्क / मोहंमद अलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा एक वर्षाचा कार्यकाळ विवाद आणि राष्ट्रपती जाे बायडेन यांच्याशी संघर्षाच्या वृत्तांनी गाजला आहे. मागील वर्षी पहिली महिला आणि अश्वेत उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळताना त्यांच्यात भरपूर क्षमता असल्याचे गुणगान झाले. तथापि, राजकीय विश्लेषकांचा दावा आहे की, त्या वारंवार वादात पडत राहिल्या. अजूनही त्या उपराष्ट्रपती म्हणून चुणूक दाखवू शकल्या नाहीत, ज्यासाठी त्या आधी खूप चर्चेत होत्या.

उपराष्ट्रपतींच्या ताफ्यातील लोक व्हाइट हाऊसमध्ये सन्मान मिळत नसल्याने नाराज आहेत. मात्र हॅरिस या बायडेन यांच्याशी वाद नसल्याचे सांगतात. तरीही असे बोलले जात आहे की, बायडेन २०२४ मध्ये पुन्हा राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढले तर उपराष्ट्रपतिपदासाठी कमला यांची उमेदवारी नसेल. बायडेन मैदानात उतरणार नसले तरी कमला राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार असतील याची शाश्वतीही नाही. कमला यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना सांगितले की, राजकीयदृष्ट्या त्या काम करण्यास समर्थ आहेत, मात्र ते करताना त्यांना बंधन जाणवत आहे. यामुळेच त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांबाबत बोलताना सहकारी सतर्कता बाळगत आहेत.

कमला यांच्याकडे राजकीय आव्हानांची जबाबदारी
टीम हॅरिसचे म्हणणे आहे की, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या नाहीत. बायडेन यांनी सर्वप्रथम सीमांची जबाबदारी दिली. टीम बायडेनचे म्हणणे आहे की, बराक आेबामांनीही बायडेन यांना हीच जबाबदारी दिली होती. फ्रान्ससोबतच्या राजकीय तणावानंतर गेल्या महिन्यात हॅरिस तेथे गेल्या होत्या. दौरा यशस्वी होत असतानाच त्या ३७५ डॉलर्सच्या कॉपर पॉट खरेदीच्या वादात अडकल्या.

बातम्या आणखी आहेत...