आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर बदलले:अमेरिकने 75 हजार कोटींचा निधी द्यावा, आम्हाला मैत्रीचे वावडे नाही, अफगाणचे परराष्ट्रमंत्री मुत्ताकींचे वक्तव्य

काबूलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानच्या तालीबान सरकारचे सूर आता बदलत आहेत. अफगाणचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी एका मुलाखतीत म्हटले की, त्यांना जुना शत्रू अमेरिका आणि इतर पश्चिमी देशांसोबत मैत्रिपूर्ण नाते ठेवण्याचे वावडे नाही. अफगाणी लोक सध्या अडचणींचा सामना करत आहेत. जागतिक बांधवांनी मदतीसाठी पुढे यायला हवे. ते म्हणाले की, नवे सरकार अफगाणिस्तानात महिलांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. महिलांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल. मुत्ताकी म्हणाले की, ७५ हजार कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर जारी केला जावा.

हा फंड अमेरिकेने ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालीबान सत्तेत आल्यानंतर गोठवला होता. त्यांनी म्हटले की, अफगाणिस्तानवर निर्बंध लादून काहीच मिळणार नाही. मुत्ताकी म्हणाले की, यावेळचे तालिबान राज पूर्वसारखे नाही. आम्ही अनेक बदल केले आहेत. आज १२ वीत शिकत असलेल्या मुली देशातील १० प्रांतांतील शाळांत जात आहेत. तालीबान सरकारने सत्ता काबीज केल्यानंतर बदल्याच्या भावनेतून कोणतीच कारवाई केली नाही. पण सत्ता मिळाल्यानंतर काही चुका मात्र केल्याचे त्यांनी मान्य केले.

बातम्या आणखी आहेत...