आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाताची बोटे लहान-मोठी असण्याचा संबंध मजबुतीशी असू शकतो का? असतो.ज्या महिलांची तर्जनी (इंडेक्स फिंगर) अनामिकेपेक्षा (रिंग फिंगर) लहान असते, त्या शारीरिकदृष्ट्या जास्त मजबूत असतात. ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठाच्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.
संशोधकांनी २ डी : ४ डी डिजिट गुणोत्तर (तर्जनी आणि अनामिकेतील लांबीतील फरक) मांसपेशींच्या ताकदीशी जोडून पाहिला आहे. २ डी : ४ डी गुणोत्तराची गणना तर्जनीच्या लांबीला अनामिकेच्या लांबीने भागून केली जाते. अभ्यासाचे लेखक कॅटरीन शेफर यांनी सांगितले की, २ डी : ४ डी चा स्तर कमी असणे (तर्जनी अनामिकेपेक्षा लहान असणे) गर्भात उच्च टेस्टॉस्टेरॉनच्या उच्च जोखमीचा संकेत आहे.
मोठे झाल्यानंतर त्याचा परिणाम वस्तू पकडण्याच्या क्षमतेवर दिसतो. अभ्यासात असे आढळले की, जास्त २ डी : ४ डी असलेल्या महिलांची पकड शक्ती तुलनात्मकदृष्ट्या जास्त असते. पुरुषांच्या प्रकरणात तर हे आधीपासूनच सिद्ध झालेले होते, आता महिलांतही हेच दिसले आहे. अभ्यासात ऑस्ट्रियाच्या १९ ते ३१ वर्षांच्या निरोगी महिलांचा समावेश करण्यात आला होता. डायनॅमोमीटरद्वारे त्यांची ग्रिप स्ट्रेंथ (हाताची पकडण्याची ताकद) मोजण्यात आली.
हे एक हँडल असलेले उपकरण आहे, त्याचा वापर रुग्णांची ग्रिप स्ट्रेंथ मोजण्यासाठी केला जातो. ताकद कमी असेल तर कार्डियामेटॉबॉलिक रोगाचा संकेत मानला जातो. या आधारावर संशोधकांनी दावा केला की, महिलांच्या बोटांतील २ डी : ४ डी गुणोत्तर आणि ग्रिप स्ट्रेंथ यांत स्पष्ट संबंध आहे. तथापि, वय, पर्यावरण, व्यायाम या घटकांचा परिणाम होऊ शकतो. जिमला जाणाऱ्या लोकांनाही हँड ग्रिपबाबत समस्या जाणवते. त्यामुळे व्यायामात अडचण येऊ नये यासाठी ते ग्लोव्ह्ज किंवा इतर साधनांचा वापर करतात.
२ डी : ४ डी गुणोत्तराबाबत आणखी बराच रंजक अभ्यास झाला आहे. स्वानसी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, सरासरीपेक्षा जास्त वेतन मिळत असलेल्या महिलांच्या मुलांचे २ डी : ४ डी गुणोत्तर कमी होते.
बोटांच्या तळाशी असलेल्या क्रीज बँडपासून मोजू शकता लांबी
बोटाची लांबी मोजण्यासाठी ते सरळ करा, नंतर पूर्ण तळहात पाहा. तर्जनी आणि अनामिकेच्या तळाशी क्रीज असते. तर्जनीत एक, तर अनामिकेत अनेक क्रीज बँड असू शकतात. तळहाताच्या सर्वात जवळ असलेला क्रीज बँड निवडा. बँडच्या मध्यबिंदूवर पेनाने एक डॉट बनवा. डॉटपासून बोटाच्या वरच्या बाजूपर्यंतचे अंतर मोजा. कोणते बोट मोठे आहे हे तुम्हाला कळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.