आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई:दहा दिवसांत 18 लाख प्रवासी भेट देण्याची शक्यता, दुबई विमानतळाची क्षमता 100%

दुबई / शानीर एन सिद्दिकी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईमध्ये रेसिडेन्सी अँड फाॅरेनर्स अफेअर्सचे संचालक माेहंमद अहमद अल मररी म्हणाले, २०२० च्या सुरुवातीला दुबईहून दरराेज २ लाख १० हजार प्रवाशांनी भेट दिली हाेती. आता १ लाख ४५ हजारांहून जास्त प्रवासी येऊ लागले आहेत. २०१९ नुसार ही संख्या समान आहे. अमिरातच्या विमानतळाने २०२१ च्या पहिल्या सात महिन्यांत १.३ कोटी प्रवाशांचे व्यवस्थापन केले. दुबई इंटरनॅशनलने ऑक्टोबरमध्ये सर्वात व्यग्र विमानतळ अशी नोंद केली.

काेराेनामुळे बेहाल झालेल्या विमानसेवा क्षेत्रासाठी चांगले संकेत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने २५ नाेव्हेंबरपूर्वीसारखी स्थिती पुन्हा मिळवली आहे. विमानतळावर १० दिवस म्हणजे ५ डिसेंबरपर्यंत १८ लाख प्रवासी भेट देण्याची शक्यता आहे. या प्रमाणात दरराेज सरासरी १ लाख ६४ हजार प्रवाशांची ये-जा असेल. संपूर्ण क्षमतेने काम सुरू हाेण्याच्या आधी दुबईने एक्स्पाे २०२०, टी-२० वर्ल्डकप व आयपीएलसह रिकव्हरीची सुरुवात केली हाेती. त्यानंतर विमानतळ पूर्ण क्षमतेने काम करू शकला आहे. दाेन आठवड्यांपूर्वी दुबई एअर शाेच्या तयारीदरम्यान दुबईच्या नागरी उड्डाण प्राधिकरणचे अध्यक्ष शेख अहमत बिन सईद अल मख्तूम म्हणाले, काेविड-१९ महामारीनंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने सेवेत पूर्ववत हाेईल.

एक वरिष्ठ इमिग्रेशन अधिकारी म्हणाले, काेराेना संसर्ग हळूहळू कमी हाेत असल्याने सामान्य जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राेज सुमारे १ लाख ४५ हजार प्रवासी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जात हाेते. एक्स्पाे २०२० दुबईने सुमारे ५० दिवसांत ४१ लाख प्रवाशांनी भेट दिल्याच्या विक्रमाची नाेंद झाली.

बातम्या आणखी आहेत...