आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात पहिल्यांदाच दुबईत सरकारी कामकाज पूर्णपणे पेपरलेस होणार आहे. दुबईतील सुमारे ४५ सरकारी कार्यालयांत सर्व प्रकारचे कामकाज कागदाचा वापर न करता केले जाणार आहे. विविध प्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून १८०० हून जास्त डिजिटल सेवा १० हजार ५०० हून जास्त प्रकारचे व्यवहार केले जातात. पेपरलेस गव्हर्नन्समुळे सुमारे ३३. ६ कोटी पेपरशीटची वार्षिक बचत होणार आहे. सोबतच दुबई सरकारचे सुमारे २७०० कोटी रुपये व सुमारे १४ लाख मानवी तासांचीदेखील बचत होणार आहे.
जगातील पहिले पेपरलेस सरकार करण्यासाठी दुबईने २०१८ पासूनच प्रयत्न सुरू केले होते. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहंमद बिन राशिद अल मकतूम यांनी शनिवारी पेपरलेस सरकारी कामकाजाची घोषणा केली. मकतूम म्हणाले, दुबईच्या विकास यात्रेतील सर्व पैलूंमध्ये जीवनाला डिजिटल बनवण्याच्या दिशेने हे पुढचे पाऊल आहे. हा प्रवास नवतंत्रज्ञानासोबत सुरू आहे. अमिरातच्या नागरिकांसाठी पूर्णपणे डिजिटल जीवनशैली उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहोत. पाच वर्षांत दुबईचे डिजिटल जीवन, दुबईचा डिजिटल प्रवास आणि भविष्यातील सरकारला एक संपन्न स्मार्ट सिटीतील नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सक्षम व शक्तिशाली बनवेल. दुबईत पेपरलेस धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पाच टप्पे महत्त्वाचे ठरले. त्यासाठी आवश्यक विविध संस्थांची यादी तयार केली.
सर्व सरकारी कामकाज १०० टक्के डिजिटल
डिजिटल दुबई प्रकल्पाचे महासंचालक हमद अल मन्सुरी म्हणाले, सरकारचे सर्व कामकाज १०० टक्के डिजिटल करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीशी संबंधित सुमारे १२ प्रमुख श्रेणींतील जवळपास १३० प्रकारची कामे आता डिजिटल स्वरूपात पूर्ण केली जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.