आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिफेन्स स्टडीजचे विश्लेषक म्हणाले, जपानच्या स्वतंत्र व खुल्या इंडाे-पॅसिफिक क्षेत्राला निश्चित करण्याच्या माेहिमेत भारत सर्वात महत्त्वाचा भागीदार ठरताे. हे संबंध दृढ करण्यासाठी भारतीय हवाई दल पुढील वर्षी संयुक्त अभ्यासात सहा सुखाेई लढाऊ विमानांना जपानला पाठवेल. ब्राउनच्या म्हणण्यानुसार चीनबाबत आॅस्ट्रेलियाच्या अनुभवावरूनही खूप गाेष्टी शिकता येऊ शकतात. राजकीय व आर्थिक दबावानंतरही आॅस्ट्रेलियाने स्वत:ला स्वतंत्र ठेवले आहे. बीजिंगने आपल्या प्रत्येक मंचावर आॅस्ट्रेलियाला बदनाम करण्याचे काम केले आहे. तसे मुत्सद्दी ठेवण्यात आले आहेत. त्यानंतरही आॅस्ट्रेलियाला स्पष्ट रूपाने क्वाॅड सदस्य रूपात सुरक्षित असल्याचे वाटते.
जपानचे पंतप्रधान फुमिआे किशिदा लवकरच भारत भेटीवर येतील. याआधी जपानच्या पंतप्रधानांनी २०१८ मध्ये भारताचा दाैरा केला हाेता. त्यानंतर क्षेत्रीय परिस्थितीत नाट्यमय बदल घडून आला आहे. टेम्पल विद्यापीठाच्या टाेकियाे परिसरात आंतरराष्ट्रीय संबंधाचे असाेसिएट प्राेफेसर जेम्स ब्राऊन यांच्या म्हणण्यानुसार भारतासाेबतचे द्विपक्षीय संबंध जपानला खूप महत्त्वाचे वाटतात. केवळ अमेरिकेचे लष्करी सहकार्य जपानला महत्त्वाचे वाटत नाही. त्यामुळे जपान नवीन सुरक्षा भागीदारांचा शाेध घेत आहे. यंदा ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, आॅस्ट्रेलियासह अनेक देशांतील लष्करी अधिकाऱ्यांनी जपानचा दाैरा केला आहे. ब्राऊन म्हणाले, जपान भारतासाेबतचे संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नात आहेत. भारत विशाल व उदयाेन्मुख आर्थिक शक्ती आहे. जपानप्रमाणेच चीनशी भारताचे देखील क्षेत्रीय पेच आहेत. भारतीय सैन्याला चिनी सैनिकांशी ताेंड द्यावे लागत आहे. चीनने अरुणाचलच्या सीमेवर १०० घरांचे गाव वसवले आहे. जपानच्या संकेई वृत्तपत्राने गाव वसवण्याची चिनी कृती चिथावणीखाेर असल्याचे म्हटले आहे. अशाच प्रकारे चीनने जपानच्या आेकिनावा प्रांतातील निर्जन बेटांवर हस्तक्षेप केला आहे.
हा हस्तक्षेप जपान राेखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चीनने बेटांच्या समूहावर आपला दावा करण्यासाठी मनसुबे आखले आहेत. जपानच्या या सागरी क्षेत्रात असलेल्या नैसर्गिक साधन-संपत्तीवर चीनचा डाेळा आहे. म्हणूनच पाच वर्षांत चीनने माेहीम वेगवान केली आहे. वास्तविक चीन व जपान यांच्यात स्वाभाविक भागीदारी आहे. आता किशिदा भारत दाैऱ्यावर येतील तेव्हा जपान व भारत चीनच्या बेल्ट अँड राेडला पर्याय देण्यावर विचार करू शकतील. पायाभूत प्रकल्पासाठी उभय देश एकत्र येण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.