आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Marathi News | Pakistan Army Reality; Imran Khan 2018 Power And Nawaz Sharif Jail Order, Leaked Audio

ऑडिओने हादरा:न्यायमूर्तींवर नेमका कुणाचा दबाव : मरियम, इम्रान म्हणाले : हे शरीफ परिवाराचे नाट्य

इस्लामाबाद / नासिर अब्बास12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती म्हणाले, शरीफ यांना अडकवले

पाकिस्तानात लीक झालेल्या एका ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप झाला आहे. ऑडिओमध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती साकिब निसार अज्ञात व्यक्तीशी संभाषण करत आहेत. माझ्यावर तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ व त्यांची मुलगी मरियम नवाज यांना शिक्षा देण्यासाठी दबाव होता. दुर्दैवाने आपल्या देशात न्यायाधीशांना आदेश देणारे शक्तिशाली लष्कर आहे. ही गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे. आता हे लोक म्हणतात, नवाज शरीफ यांना शिक्षा द्यावी. कारण त्यांना इम्रान खान यांना सत्तेवर बसवायचे आहे, असे निसार बोलतात. त्यावर ती व्यक्ती म्हणते- नवाजला शिक्षा योग्य आहे, परंतु मुलीला दिली जाऊ नये. त्यावर िनसार म्हणाले- अगदी बरोबर. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह लागेल.

ही ऑडिओ क्लिप पाकिस्तानच्या प्रसिद्ध यूट्यूबर व पत्रकार आलिया शहा यांनी जाहीर केली. लवकरच या ऑडिओतील संपूर्ण संभाषण जाहीर केले जाईल, असा दावाही त्यांनी केला. ऑडिअो पुढे आल्यानंतर शरीफ यांची मुलगी व पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) नेत्या मरियम नवाज म्हणाल्या, मला आणि माझ्या वडिलांना दोषी ठरवण्यासाठी कोणी दबाव आणला होता हे न्यायमूर्ती साकिब निसार यांनी सांगायला हवे.

न्यायदानातील हस्तक्षेपाचा हा पाचवा पुरावा आहे. आज ना उद्या तुम्हाला देशाला सत्य सांगावेच लागेल. साकिब निसार व लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांनी सत्य मांडले पाहिजे.

या सर्व राजकीय धक्क्यानंतर पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, कथित रूपाने निवृत्त न्यायमूर्ती निसार यांचा हा ऑडिओ म्हणजे एक नाटक आहे. पनामा पेपर्समध्ये शरीफ परिवाराचा भ्रष्टाचार उघड झाला होता. तेव्हापासूनच हे सुरू झाले आहे. इम्रान यांनी मरियम यांच्यावर टीका केली. तुम्ही न्यायालय व लष्कराला वाईट म्हणू शकता, परंतु ते अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले हे सांगा, असा टोला इम्रान यांनी लगावला.

अधिकाऱ्याने उडवली खिल्ली
कॅबिनेट विभागाचे संयुक्त सचिव हम्माद शमिमी यांनी इम्रान सरकारची खिल्ली उडवली. त्यांनी सोशल मीडियावर मत मांडले. इम्रान यांचा पक्ष पीटीआय व तालिबानमध्ये एक साम्य आहे. दोघांनाही सत्तेवर आल्यानंतर सरकार कसे चालवायचे हे समजत नाही.

इम्रान म्हणजे सिलेक्टेड पीएम : विरोधी पक्ष
या ऑडिओमुळे आगामी काळात इम्रान यांची राजकीय स्थिती बिघडू शकते. लष्करही उघडे पडले आहे. तसेही पाकिस्तानातील सर्वच विरोधी पक्ष ‘सिलेक्टेड प्राइम मिनिस्टर’ असे संबोधत आले आहेत. मरियम नवाज, मौलान फजल-उर-रहमान व बिलावल भुत्तो-झरदारी यांनी प्रत्येक मंचावरून इम्रान यांचा उल्लेख सिलेक्टेड वजीर-ए-आझम असाच केला आहे. जनतेला व इतर नेत्यांना इम्रान यांचे वास्तव ठाऊक आहे. लष्कराचा उल्लेख करायलाही घाबरतात. लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा व आयएसआय याचा फायदा घेतात.

तिकडेही फजिती / आयएमएफचा पाकला कर्ज देण्यास नकार
इम्रान सरकारला आंतरराष्ट्रीय नाणे निधीने झटका दिला आहे. कर्ज घेण्यासाठी पाकिस्तानने केलेला अर्ज आयएमएफने फेटाळून लावला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला काहीही झाले तरी कर्ज देण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थविषयक संस्था सहमत नव्हती.

बातम्या आणखी आहेत...