आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ब्रिटनमध्ये थ्री पॅरेंटच्या डिझायनर बेबीचा जन्म, IVF नंतर मानवी विज्ञानाचे आणखी एक मोठे पाऊल

दिव्य मराठी विशेषएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये दोन मातांचे एग (अंडाणू) व वडिलांचे स्पर्म (शुक्राणू) याद्वारे थ्री पॅरेंट डिझायनर बेबीचा जन्म झाला. अपत्यहीन असलेल्यांना कृत्रिम गर्भधारणेनंतरचे (आयव्हीएफ) हे चिकित्सा विश्वातील सर्वात मोठे पाऊल ठरले. नवजात बाळातील आनुवंशिक आजारांचे उच्चाटन करण्यासाठी डॉक्टर मातेच्या एग्जच्या न्यूक्लियसमधील आजारी मायटोकॉन्ड्रियाला हटवले जाते. डोनर मातेच्या एग्जला रिक्त करून निरोगी मायटोकॉन्ड्रियालास वडिलांच्या शुक्राणूशी फर्टिलायझ्ड केले जाते. त्यानंतर फर्टिलायझ एगला मातेच्या गर्भात रोपित केले जाते. त्यामुळे बालकात जन्मत: येणाऱ्या आनुवंशिक आजाराची शक्यता संपुष्टात आणली आहे. मायटोकॉन्ड्रिया शरीरातील सर्व पेशींच्या पॉवरहाऊससारखे आहे. थ्री पॅरेंट बेबीला डॉक्टर मायटोकॉन्ड्रिया डोनेशनद्वारे जन्माला येणारे नवजात असे संबोधले जाते. आईच्या गर्भात फर्टिलायझ्ड एगमध्ये बाळाच्या आई-वडिलांचे डीएनए असतात. त्यामुळे त्याचे जैविक आई-वडीलच मूळ असतात. केवळ आईच्या आजारपणाच्या जीनला मायटोकॉन्ड्रियाद्वारे हटवले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया भ्रूण विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पूर्ण केली जाते. कारण त्याच वेळी पेशीचा विकास सुरू झालेला असतो. ब्रिटनमध्ये डिझायनर बेबीच्या जन्मानंतर आता वादाला सुरुवात झाली. हा प्रयोग म्हणजे निसर्गाशी खेळ करण्याचा प्रकार असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. डॉ. डेव्हिड क्लँसी म्हणाले, आनुवंशिक आजारांना नष्ट करण्याच्या नावाखाली अशा प्रकारच्या थ्री पॅरेंट बेबीचा जन्मातून अनेक प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात. काही पालक बाळाचा चेहरा, त्वचा, लिंगातही आपल्या मनाप्रमाणे बदल करून घेऊ शकतात. या गोष्टी रोखण्यासाठी सरकारने काहीही उपाययोजना केलेली नाही.

डिझायनर बेबीसाठी २५ अर्ज बाकी, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
ब्रिटनमध्ये डिझायनर बेबीच्या जन्माबद्दल तूर्त तरी सरकारकडून कोणातीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे डिझायनर बेबीसाठी अजूनही २५ अर्ज प्रतीक्षेत आहेत. ब्रिटनमध्ये डिझायनर बेबीसाठी अधिकृत एकमेव न्यू कॅसल रुग्णालयात जेनेटिक सुरक्षेवरही अनेक प्रश्न आधीही निर्माण झाले

बातम्या आणखी आहेत...