आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इबोला परिवारातून उद्भवलेला विषाणू:मारबर्ग विषाणू देखील काेराेनासारखा संसर्गजन्य

जर्मनी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनानंतर आता नवा विषाणू मारबर्ग धडकला आहे. या विषाणूमुळे घानामध्ये गेल्या महिन्यात दाेन जणांचा मृत्यू झाला हाेता. त्यांच्या संपर्कातील लाेकांना आयसाेलेट करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्याबद्दल अलर्ट जाहीर केला आहे. या विषाणूबद्दल जाणून घेऊया...

-मारबर्ग विषाणू काय आहे?
मारबर्ग विषाणूमागे काेराेनाप्रमाणेच वटवाघूळ कारणीभूत ठरले आहे. हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करताे. बाधित जनावरांकडून माणसाकडे असा त्याचा फैलाव हाेताे. त्यानंतर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरताे. त्यातून मारबर्ग व्हायरस डिसीज (एमव्हीडी) याची जाेखीम वाढते. तसे एमव्हीडीमुळे हाेणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्के आहे. जर्मनीत सर्वात कमी मृत्युदर नाेंदवण्यात आला. तेव्हा जर्मनीत मृत्युदर २४ टक्के हाेता. २००५ मधील संसर्गानंतर अंगाेलामधील मृत्युदर ८८ टक्क्यांवर गेला आहे.

- त्याची उत्पत्ती काेठे झाली?
हा विषाणू इबाेला कुटुंबाचा सदस्य आहे. मारबर्गचा इबाेलापेक्षा वेगाने फैलाव हाेताे. १९६७ मध्ये जर्मनीच्या मारबर्ग व फ्रँकफर्टमध्ये सर्वात आधी या विषाणूचा संसर्ग पाहायला मिळाला हाेता.

-संसर्गाची लक्षणे काय आहेत? का फैलाव हाेताे?
पीडित व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्यासाठी दाेन ते एकवीस दिवसांचा कालावधी लागताे. बाधितांना थंडीताप, डाेकेदुखी, मांसपेशीतील वेदना, संक्रमित व्यक्तीचे रक्त, शरीरातील तरल पदार्थ उदाहरणार्थ-मूत्र, लाळ, घाम, मल, उलटी इत्यादीच्या संपर्कात आल्यानंतर संसर्ग हाेऊ शकताे. बाधिताचे कपडे, अंथरुणामुळेही फैलाव हाेण्याची शक्यता असते.

-मारबर्ग विषाणूपासून बचाव कसा करावा?
अद्यापपर्यंत विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी उपचार उपलब्ध नाही. बाधित व्यक्तीला उपचार म्हणून लिक्विड डाएट व इलेक्ट्राेलाइट्सला नियंत्रित करणे, ऑक्सिजन व रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि रक्ताची कमतरता भासू नये असा सल्ला दिला जाताे. बाधिताच्या थेट संपर्कात येणे टाळले पाहिजे. तुम्ही संसर्ग असलेल्या भागात वास्तव्याला असल्यास हातमाेजे, मास्क गरजेचे आहेत. बाधिताला क्वाॅरंटाइन केले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...