आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राेम:इटलीतील 101 वर्षांच्या मारियांनी तीन वेळा केली काेराेनावर मात; डाॅक्टर म्हणाले, या वयात इतक्या लवकर बरे हाेताना बघितले नाही

राेम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतातील 106 वर्षांच्या आनंदीबाईंचीही काेराेनावर मात

इटलीतील १०१ वर्षांच्या मारिया आेरसिंघेर यांचे नाव काेराेना याेद्धा म्हणून नाेंद झाले आहे. नऊ महिन्यांत तीन वेळा काेराेनाचा संसर्ग हाेऊनही प्रत्येक वेळी या प्राणघात विषाणूवर या वयात मात केल्याने आम्ही खराेखरच आश्चर्यचकित झालाे आहाेत. मारियाला पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांची मुलगी कार्ला म्हणाली, मी आईला फेब्रुवारीमध्ये साेंडालाे रुग्णालयात दाखल केले हाेेते. त्या वेळी येथे काेराेना संसर्गाने माेठ्या संख्येने ज्येष्ठांचा मृत्यू हाेत हाेता. आम्ही खूप घाबरलाे हाेताे. आई बरी झाल्यानंतर डाॅक्टर मला म्हणाले, वयस्कर व्यक्तीला इतक्या लवकर काेराेनातून बरे हाेताना कधी बघितले नाही. त्यांना श्वास घेण्यासाठी कधीही मदतनिसाची कधीही गरज पडली नाही ना त्यांना जास्त ताप हाेता. जुलैमध्ये त्यांनी आपला १०१ वा वाढदिवस साजरा केला. सप्टेंबरमध्ये त्यांना पुन्हा संसर्ग झाला आणि नाेव्हेंबरमध्ये तिसऱ्यांदा त्यांची चाचणी पाॅझिटिव्ह आली. सध्या त्या घरी विश्रांती घेत आहेत.

भारतातील 106 वर्षांच्या आनंदीबाईंचीही काेराेनावर मात
काेराेनावर मात करणाऱ्या मारिया या पहिल्याच वयस्कर नाहीत. देशात केरळच्या अलुवामध्ये राहणारे १०३ वर्षांचे पुराक्काट वेट्टील पारिद यांनी आॅगस्टमध्ये, तर महाराष्ट्रातल्या ठाणे येथील १०६ वर्षांच्या आनंदीबाई पाटील यांनी सप्टेंबरमध्ये काेराेनावर विजय मिळवला हाेता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser