आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पेन:113 वर्षांच्या मारिया यांनी कोरोनापासून मिळवली मुक्ती, महायुद्धापासून साथरोगापर्यंत मुक्त जीवन जगल्याचे सांगितले

माद्रिदएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कोरोनावर मात करणारी स्पेन व जगातील ज्येष्ठ महिला रुग्ण मारिया ब्रान्यस

स्पेनच्या ११३ वर्षीय मारिया ब्रान्यस यांनी कोरोनावर विजय मिळवला. कोरोना पराभूत करणाऱ्या त्या स्पेन व जगातील सर्वात वयोवृद्ध महिला आहेत. कॅटालोनिया राज्यातील ओलाटमध्ये केअरहोममध्ये राहणाऱ्या मारिया एप्रिल महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यानंतर त्यांनी स्वत: विलगीकरण कक्षात राहिल्या. कॅटोलिनिया कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित भाग आहे. येथे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू व अन्य आजारातून त्या बऱ्या झाल्या. मारिया यांना तीन मुले आहेत. एका अपत्याचे वय ८६ वर्षे आहे. त्यांना ११ नातू व १३ पणतू आहेत. मारिया यांनी मार्च अखेरीस साेशल मीडियावर लिहिले, कोरोनाने त्यांच्या केअर होमपर्यंत प्रवेश केला आहे. यानंतर २ एप्रिल रोजी लिहिले, मी खोलीत निर्धास्त आहे. सगळे व्यवस्थित होईल, हीच एक आशा आहे. जगात काय सुरू आहे, याची मला कल्पना आहे. परंतु हीच परिस्थिती कायम राहिल असे नाही. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर मारिया म्हणाल्या, महायुद्ध ते साथरोगात मी मुक्तपणे आयुष्य जगले. आता मी तुमची मदत करण्यास सक्षम नाही. कारण या वयात मला ते जमणारही नाही. परंतु तुम्हाला तुमची मूल्ये व प्राथमिकता नव्याने ठरवण्याची गरज आहे. मारिया यांची मुलगी रोजो मॉरेट यांनी आईच्या टि्वटर अकाऊंटवरून त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांना काेरोनातून बरे होणाऱ्या स्पेनमधील सर्वात वृद्ध महिला मानले आहे. आता रोजो यांनी टिवटर अकाउंटचे नाव कॅटलाॅनची सुपर दादी केले आहे.

४ मार्च रोजी कुटुंबीयांना न भेटता वाढदिवस साजरा

मारिया यांनी ४ मार्च रोजी ११३ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर १० दिवसांनी कोरोनामुळे स्पेनमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून मारिया कुटुंबीयांना भेटू शकल्या नव्हत्या. फोन व व्हिडिओ कॉलवरून त्यांचे बोलणे होत असे. मारिया ज्या केअर होममध्ये राहत हाेत्या, तेथे त्यांची मुलगी रोजाेने सुमारे २० वर्षे घालवली होती. आता मारिया एकदम स्वस्थ आणि आनंदी आहेत.

बातम्या आणखी आहेत...