आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानातच शुभमंगल:जपानमध्ये आता उभ्या विमानातच विवाह उरकताहेत, कोरोनातील नुकसान भरून काढण्यासाठी शक्कल

टोकियो16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 पाहुण्यांना परवानगी, 10 लाख रुपये मोजावे लागतात; जपानमध्ये मे-जूनमध्ये सर्वाधिक विवाह

जपानची सर्वात मोठी एअरलाइन्स ऑल निप्पोन एअरवेजने विमानाला जणू मॅरेज हॉल बनवले आहे. आता विमानतळावर उभ्या असलेल्या विमानातच विवाह उरकले जात आहेत. त्यासाठी केवळ ३० पाहुण्यांना परवानगी आहे. कंपनीच्या वतीने विमानात लाइव्ह म्युझिकसह खाद्यपदार्थांची व्यवस्था दिली जात आहे. मात्र विवाहासाठी सुमारे १० लाख रुपये मोजावे लागतात.

निप्पोन एअरवेजकडे लहान-मोठी २३९ विमाने आहेत. कोरोनामुळे ९० टक्के विमान ठप्प आहेत. त्याचा दररोज कंपनीला कोट्यवधींचा फटका बसत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने ही कल्पना लढवली. आता कंपनीने विमानातील विवाहाचा कार्यक्रमच सुरू केला आहे. एअरलाइनचे अधिकारी मामी मुराकामी म्हणाले, जपानची लोकसंख्या सुमारे १२.७० कोटी आहे. जपानमध्ये मे-जून हा विवाहाचा काळ असतो. या दरम्यान देशभरात हजारो विवाह होतात. परंतु यंदा कोरोनामुळे मॅरेज गार्डन बंद आहेत. सुरू असलेल्या गार्डनमध्ये गर्दी होत आहे. गर्दी टाळू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

साडेतीन तासांत विवाह, लगेच आकाश भ्रमंती
मामी मुराकामी म्हणाले, साडेतीन तासांत विवाह होतो. त्यात भोजन, स्वागत, संगीत सुविधा आहेत. या तीन तासांत नवदांपत्याला पाहुण्यांसह आकाशाची सैर करून आणले जाते. त्यात विमानाचे पायलट व कर्मचारीही सहभागी होतात. कंपनीने गेल्या सात दिवसांत २० हून जास्त विवाहांचे यशस्वी आयोजन केले.

बातम्या आणखी आहेत...