आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांनी आनंद लुटला:तब्बल पावणेदोन तास मंगळ ग्रह चंद्रबिंबाच्या मागे दडून राहिला होता

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पिधान युतीची ही घटना आशिया खंडातील काही भागातूनच पाहायला मिळाली

शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी पंचमीच्या चंद्राने अंधाऱ्या बाजूकडून मंगळ ग्रहाला झाकून टाकले. औरंगाबाद येथे सूर्यास्त न झाल्याने हा क्षण पाहायला मिळाला नाही. मात्र सायंकाळी सूर्यास्तानंतर ७ वाजून २४ मिनिटांनी तांबडा मंगळ ग्रह चंद्रबिंबाच्या बाहेर येण्यास सुरुवात झाली. म्हणजेच तब्बल पावणे दोन तास मंगळ ग्रह चंद्रबिंबाच्या मागे दडून राहिला होता. या वेळी मंगळ ग्रह वृषभ राशीत होता. परंतु मंगळ ग्रह पृथ्वीपासून खूप दूर असल्यामुळे मंगळाचे बिंब खूप लहान दिसत होते.

पिधान युतीची ही घटना आशिया खंडातील काही भागातूनच पाहायला मिळाली. शहरात अनेक नागरिकांनी ही खगोलीय घटना डोळ्यांनी पाहण्याचा आनंद लुटला. एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी या घटनेचे छायाचित्रण केले.

बातम्या आणखी आहेत...