आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Mars Mission: NASA's Perseverance Rover Successfully Lands On Jazero Crater On Mars, To Investigate Life News And Updates In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नासाचे मंगळ अभियान यशस्वी:पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावरील जजिरो क्रेटरवर यशस्वीरित्या उतरला, जीवनसृष्टीचा तपास करणार

वॉशिंग्टन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळ ग्रहावर लँडिंग होताच 'पर्सिव्हरन्स रोव्हर'ने फोटो क्लिक करत पृथ्वी पाठवले.

अमेरिकेन अंतराळ संस्था नासाचा 'पर्सिव्हरन्स रोव्हर' गुरूवारी मंगळ ग्रहावरील पाणी आणि जीवसृष्टीचा तपास करण्यासाठी जजिरो क्रेटरवर यशस्वीरित्या उतरला. भारतीय वेळेनुसार या रोव्हरने गुरूवार आणि शुक्रवाराच्या दरम्यान रात्री दोन वाजता मंगळावरील सर्वात धोकादायक जजिरो क्रेटरवर लँडींग केली. एकेकाळी या जागेवर पाणी असून नासाने दावा केला आहे की, ही इतिहासातील सर्वात अचूक लँडींग आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळ ग्रहावरून माती आणि खड्याचे नमूनेदेखील घेऊन येणार आहे.

सहा पायांचा हा रोबोट सात महिन्यात 47 कोटी किलोमीटराचा प्रवास पूर्ण करत आपल्या लक्षाजवळ पोहचला आहे. शेवटचे सात मिनट या रोबोटसाठी खुपच कठीण आणि धोकादायक होते. यावेळी, ते फक्त 7 मिनिटांत 12 हजार मैल प्रति तासावरुन 0 वेगावर येत नंतर ती लँडिंग झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही त्यांच्या कार्यालयातून हे लँडिंग पाहिले.

बातम्या आणखी आहेत...