आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मिशन मंगळ:11 दिवसांत तिसरी मोहीम, पहिल्यांदा मंगळ ग्रहावर ‘हेलिकाॅप्टर’ उड्डाणाचे प्रयत्न

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूएईची हाेप, चीनचे तियानवेन-1 नंतर 30 जुलैला अमेरिकेच्या पर्सेव्हरेन्सचे होणार उड्डाण

अमेरिका ३० जुलै राेजी मंगळ ग्रहावर उपग्रह रवाना करेल. गेल्या अकरा दिवसांतील ही तिसरी मंगळ माेहीम ठरणार आहे. याआधी १९ जुलै राेजी यूएईने व २३ जुलैला चीनने आपापले यान मंगळ ग्रहासाठी रवाना केले. मंगळावर पाेहाेचण्याच्या शर्यतीत तीनही माेहिमा वेगवेगळ्या उद्देशाने राबवल्या जात आहेत. त्यात पाण्याचा शाेध, आॅक्सिजन बनवण्यापासून मंगळावर हेलिकाॅप्टरच्या उड्डाणाचा प्रयत्न इत्यादी गाेष्टींचा समावेश आहे. चला जाणून घेऊया त्यांची वैशिष्ट्ये आणि आगामी प्रकल्पांबाबत....

पर्सेव्हरेन्स, अमेरिका : ऑक्सिजन बनवणार, जमिनीखालील पाणी शाेधेल...

वैशिष्ट्ये : पर्सेव्हरेन्सची डिझाइन २०१२ मध्ये लाँच क्युरिआॅसिटीसारखी आहे. पर्सेव्हरेन्समध्ये दाेन उपकरणे आहेत. राेव्हर व सुमारे ४ पाउंड वजनाचे ड्राेन इत्यादी छाेटे हेलिकाॅप्टर आहे. ते उड्डाणादरम्यान राेव्हरच्या संपर्कात राहतील. साैर ऊर्जा पॅनल, कार्बन ब्लेड अाहे. लँड हाेण्यासाठी अॅल्युमिनियमचा पृष्ठभागही चालेल. प्लुटाेनियम ऊर्जा पुरवठ्याचा उपयाेग केला जाईल.

काय करणार : कार्बन डायआॅक्साइडने आॅक्सिजनची निर्मिती, मंगळ यात्रेकरूंना अनेक गाेष्टींना ताेंड द्यावे लागेल. अशा पर्यावरणविषयक परिस्थितीचे अध्ययन केले जाईल. भूगर्भातील पाणीपातळीची माहितीदेखील िमळवली जाणार आहे.

तियानवेन-1, चीन : मंगळावर ९० दिवसांच्या मुक्कामाची याेजना, २०११ मध्ये अयशस्वी

वैशिष्ट्ये : तियानवेनचा अर्थ क्वेश्चन्स टू हेवन म्हणजे स्वर्गाशी प्रश्न. हे नासाच्या २ हजारच्या दशकात बनवलेल्या ‘स्पिरिट अँड अपाॅर्च्युनिटी’ यानाशी मिळतेजुळते आहे. वजन २४० किलाे आहे. त्यात ऑर्बिटर, लँडर, राेव्हर प्रमुख उपकरणे आहेत. लँडरमध्ये पॅराशूट, थ्रस्टर लावलेले आहे. ते राेव्हरला सहजपणे उतरवण्यासाठी मदत करेल. ४ साैर पॅनल आहे.

काय करणार : राेव्हर १८ फेब्रुवारी २०२१ राेजी मंगळवारी जजिराे क्रेटरवर उतरून मातीचे नमुने गाेळा करेल. फेब्रुवारी २०२१ मध्ये हे यान मंगळाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात दाखल हाेईल. तियानवेन-१ा मध्य रेषा भागावर दाेन-तीन महिन्यांपर्यंत परिक्रमा करेल.

हाेप ऑर्बिटर, यूएई : मंगळावरील पाणी कसे व काेठे गायब झाले, हे शोधण्यावर भर

वैशिष्ट्ये : यूएईची मंगळ माेहीम जपानच्या तनेगाशिमा अंतराळ केंद्रातून झेपावेल. उंची ६ फूट व वजन सुमारे ३ हजार पाैंड. उष्णतेपासून वाचणारे कवच, साैर ऊर्जा पॅनल आहेत. अँटिनाच्या साह्याने पृथ्वीच्या संपर्कात राहता येणार आहे. त्याशिवाय हाय रिझाेल्युशनच्या फाेटाेसाठी कॅमेरा, इन्फ्रारेड स्पेक्ट्राेमीटर व तिसरे अल्ट्राव्हॉयलेट स्पेक्ट्राेमीटर अशी अन्य तीन उपकरणे आहेत.

काय करणार : हे ऑर्बिटमध्ये भ्रमंती हवामानाची माहिती घेईल. इन्फ्रारेड स्पेक्ट्राेमीटर, धूळ, बर्फ, ढग, आर्द्रता, तापमान इत्यादीचे याद्वारे अध्ययन हाेणार आहे. धुळीचा मंगळावर परिणाम हाेताे. मंगळावर पाणी हाेते का याचा शोध घेईल.