आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा पोहोचला होता. मात्र, लाहोरच्या पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 70 वर्षीय इम्रान खान आपल्या रुममध्ये गेल्यानंतर आढळून आले नाहीत. यावर पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) नेत्या मरियम नवाझ यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी इम्रान खान यांना गिधाड आणि भ्याड असे म्हटले.
मरियम यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या की, गिधाड चोरी केल्यावरही दुसऱ्यांच्या मुलींच्या मागे लपून बसतो आणि अटक टाळण्यासाठी ढाल म्हणून त्यांचा वापर करतो. दुसरीकडे अटकेमुळे संतप्त इम्रानचे समर्थक रस्त्यावर आले आहेत. यात महिलांचा समावेश आहे. पोलिसांना शंका आहे की इम्रान अटक टाळण्यासाठी महिला आणि मुलांचा वापर करत आहेत.
ट्विटमध्ये मरियम म्हणाले की, नवाज शरीफ धाडसी आहेत. कारण, ते कठीण काळात पळून गेले नाहीत आणि तुरूंगात गेले. इम्रान खान कधीही तुरूंगात गेले नाही. मरियम यांनी इम्रान खान यांची तुलना आपले वडिल नवाझ यांच्याशी केली. वडिलांना सिंह असे संबोधले. तर इम्रान खान यांना गिधाड म्हटले. पुढे मरियम म्हणाल्या की, सिंह हा निर्दोष असून लंडनहून पाकिस्तानला येतो आणि तुरूंगात जातो. पण, गिधाड लपत आहे. पाकिस्तानच्या जनतेला सिंह आणि गिधाडामधील फरक समजला आहे.
पुढे मरियम म्हणाल्या की, जेल भरो तहरीक ही इतिहासातील सर्वात अयशस्वी चळवळ आहे. इम्रान खान पीएमएल-एन सुप्रीमो नवाज शरीफ यांच्यासारखे धाडसी नाही. ते भेकड आहेत. त्यांनी देश सोडले पाहिजे. तसेच मरियम यांनी इम्रान खान यांना थोडे धैर्य देण्याची विनंतीही नवाज शरीफ यांना केली.
घराबाहेर पडल्याच्या काही तासांनंतर इम्रान खान यांनी लाहोरमध्ये आपल्या समर्थकांना संबोधित केले. ते म्हणाले की, पाकिस्तानचा इतका अपमान कधीही झाला नाही. आमचे गुन्हेगार भीक मागत आहेत. मी कधीही कोणासमोर झुकलो नाही, मी फक्त अल्लाहसमोर झुकतो.
तोशखाना प्रकरणात अटक
तोशखाना प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खानला अटक करण्यासाठी पाकिस्तान पोलिस 5 मार्च रोजी त्यांच्या घरी पोहोचले. सत्ताधारी पाकिस्तानी लोकशाही चळवळीने तोशखाना भेटवस्तूचा मुद्दा मांडला होता. इम्रान खान यांनी आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकल्या. इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, त्यांनी या सर्व भेटवस्तू 2.15 कोटी रुपयांत तोशाखानाकडून विकत घेतल्या. पण, या भेटवस्तुची रक्कम ही 20 कोटींपेक्षा जास्त होती, हे नंतर उघड झाले.
इम्रान खान तोशखाना प्रकरणात अडकले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.