आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:स्केलेटल स्नायू मजबूत करणे गरजेचे, यातील प्रोटीन 85 व्या वर्षीही संसर्गापासून रक्षण करेल

वॉशिंग्टन | जेन ई. ब्रॉडीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • केवळ मास्क, हात धुणे किंवा आयसोलेशन पुरेसे नाही

कोरोना संकटात मास्क घालणे, हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग आणि विलगीकरण यासारखे उपाय केले जात आहेत. मात्र दोन गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. त्या आहेत, रोगप्रतिकारशक्ती आणि उतकांची सूज रोखण्याचे उपाय. कारण संसर्गाचा शिकार होण्याच्या जोखमीत ही दोन्ही महत्त्वाची कारणे आहेत. कोरोना संकटात इम्युनिटी वाढवणे आणि सूज थांबवणे सर्वात महत्त्वाचे झाले आहे. अमेरिकन फेडरेशन फॉर रिसर्चचे संचालक डॉ. निर बारजिलाई सांगतात, ज्येष्ठ कोरोनाबाबत विशेष संवेदनशील आहेत आणि त्याचे संभाव्य घातक परिणाम होऊ शकतात हे सत्य आहे. ८० वर्षांच्या व्यक्तीला संसर्गाची भीती २० वर्षांच्या युवकाच्या तुलनेत १८४ पट जास्त आहे. मात्र ज्येष्ठ असण्याचा अर्थ कमकुवत असणे नव्हे. धोका ५५ व्या वर्षीच सुरू होतो. इतर उपायांच्या बराेबरीने शरीराला गती देणारे अाणि हाडांशी संबंधित स्केलेटल मसल्सनाही मजबूत करणे गरजेचे अाहे.

संसर्गापासून वाचण्यासाठी या पद्धती वापरून वाढवा प्रतिकारशक्ती

> डी जीवनसत्त्व वाढवा. हे रक्त वाढवते. प्रतिकारशक्त वाढवून फप्फुसांचे नुकसान करणाऱ्या सायकोटिनला रोखते. कोरोनामुळे याच कारणांनी अनेक मृत्यू झाले आहेत.

> संत्रा, द्राक्ष, लाल शिमला मिरची, पालक, पपई, ब्रोकली सारखे आंबट फळं खा.

> दुग्धजन्य पदार्थ रेड मीठ, डाळी, नट्स खा.

बातम्या आणखी आहेत...