आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानची लोकसंख्या भलेही वृद्ध असेल, परंतु प्रगत देशांच्या तुलनेत कोरोनाचा सर्वात कमी मृत्युदर राखण्यात जपानला यश मिळाले आहे. मृत्युदर कमी राखण्यासाठी जपानने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. त्यात वेगवान लसीकरण, मोफत वैद्यकीय सेवा, जनजागृती करणे, निर्बंधांचे पालन करणे यांचा समावेश होता. जपानने लागू केलेले उपाय या समस्येवर इतर देशांप्रमाणेच प्रभावी ठरले. कारण जनतेने सरकारवर पूर्ण विश्वास ठेवला होता. लोकांना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले. जपानमध्ये १० लाख लोकसंख्येमागे २४६ जणांचा मृत्यू झाला. ओईसीडीच्या ३८ देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी होते. न्यूझीलंडमध्ये १० लाख लोकसंख्येमागे २५७ जणांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या वाढताच जपानने शारीरिक डिस्टन्सिंगचे पालन करायला सुरुवात केली. कोरोना आटोक्यात असला तरी जपानमधील ९० टक्के लोक मास्क वापरतात. चीन, इटली, न्यूझीलंडसारख्या देशासारख्याू कडक निर्बंधांची जपानमध्ये गरज नाही.
अमेरिकेएवढे झाले जपानमध्ये लसीकरण
जपानमध्ये अमेरिकेएवढे लसीकरण झाले आहे. ६५ वर्षांहून जास्त वयाच्या ९३ टक्के लाेकांना २ डोस ९० टक्के लाेकांना बुस्टर डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत या वयोगटातील ९४ टक्के लाेकांना २ डोस व ८८ टक्क्यांना बूस्टर देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.