आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटन:मास्क, लसीकरण, सक्तीला नागरिकांचा विरोध, लॉकडाऊनच्या विरोधात निघालेला सर्वात मोठा मोर्चा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामारीच्या नावाखाली सरकार घोटाळे करत असल्याचा आरोप

लंडन | छायाचित्र लंडनच्या ट्रेफलर स्क्वेअरचे आहे. येथे लॉकडाऊन, मास्क आणि लसीकरणाला विरोध करण्यासाठी १० हजारांहून अधिक लोक एकत्र आले. तर, नव्या नियमानुसार एका वेळी ३० हून अधिक लोक एकत्र येण्यास बंदी आहे. येथे निदर्शनांनंतर १० डाऊनिंग स्ट्रीटपर्यंत (पंतप्रधानांचे निवासस्थान) मोर्चाही काढण्यात आला. हा लॉकडाऊनच्या विरोधात निघालेला सर्वात मोठा मोर्चा होता, असा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मोर्चात बहुतांश लोकांनी मास्क घातलेले नव्हते. शिवाय, डिस्टन्सिंगचेही पालन केले नव्हते. कोरोनामुळे लावण्यात आलेेल निर्बंध तत्काळ मागे घ्यावेत, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी होती. सरकार महामारीच्या नावाखाली घोटाळे करत असल्याचा आरोपही या लोकांनी केला. दरम्यान, या प्रचंड गर्दीबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे एकूण ३,३२,७५२ रुग्ण असून आतापर्यंत ४१ हजार ४९८ लोकांचा मृत्यू झाला. रोज सरासरी 1100 रुग्ण आढळत आहेत.

विद्यापीठे बंदच राहणार
पुढील महिन्यात विद्यापीठे उघडण्याची योजना ब्रिटन सरकारने तूर्त स्थगित केली आहे. सर्व अभ्यासक्रम आता ऑनलाईनच पूर्ण केले जाणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

कॉर्बिन यांचे बंधू अटकेत
विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बिन यांचे बंधू पीअर्स यांना अटक करण्यात आली. त्यांच्या पुढाकारातूनच हे लोक जमल्याचा आरोप आहे. ५-जी हे पण कोरोनाचे कारण असल्याचे पीअर्स म्हणतात.