आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Mass Protests Against Putin, 'Let's Give Russia Freedom, Putin A Thief ..' Demand For Release Of Navlani

रशियात राजकीय तांडव:पुतीन यांच्याविरोधात मोठे आंदोलन, ‘रशियाला स्वातंत्र्य देऊ, पुतीन चोर..’ घोषणा देत लोक रस्त्यावर; नवेलनीला मुक्त करण्याची मागणी

रशिया2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवेलनी समर्थकांची 109 शहरांत निदर्शने, पत्नीसह 3400 अटकेत

अँटन ट्रिओनोवस्की, अँड्रयू हिगिंस
रशियात राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे कट्टरविरोधी एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेच्या विरोधात १०९ शहरांत कडाक्याच्या थंडीत आंदोलक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी रविवारपर्यंत ३४०० हून जास्त निदर्शकांना अटक केली. अटक केलेल्यांत नवेलनी यांची पत्नी युलिया नवलन्या, प्रवक्ते आणि वकिलाचाही समावेश आहे. पुतीन यांच्याविरोधात रशियातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन आहे. या आंदोलनाबाबत पुतीन यांनी कडक भूमिका घेतली आहे. निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी सरकारने अनेक शहरांतील इंटरनेट सेवा बंद केल्या. काही भागांत मोबाइल नेटवर्क बंद आहे. पोलिसांनीदेखील आंदोलकांवर लाठीमार सुरू ठेवला आहे. लोकांना आेढून बस व ट्रकमधून नेले जात आहे. आंदोलन दडपले जात असले तरी आंदोलकांची संख्या वाढत चालली आहे. ‘रशिया स्वतंत्र करू, पुतीन चोर’ असे फलक आंदोलकांनी झळकावले आहेत. नवेलनी यांची लवकरात लवकर सुटका करावी अशी लोकांची मागणी आहे. सैबेरियाच्या भागात तापमान उणे ५१ अंशांवर आहे. अशा कडाक्याच्या थंडीतही पुतीन विरोध होत आहे. देशभरातील लाखो लोक रस्त्यावर आहेत. राजधानी मॉस्कोमध्ये ७० हजार आंदोलक सहभागी झाले आहेत. पोलिसांच्या लाठीमाराचा अमेरिका व युरोपीय देशांनी निषेध केला.

आंदोलनाचे कारण : ४४ वर्षीय अॅलेक्सी नवेलनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांनी २०१८ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांच्यावर एक ठपका ठेवून त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती. गेल्या वर्षी २० ऑगस्टला नोविचोक विष दिल्यानंतर ते जर्मनीत उपचार घेत होते. तेथून १७ जानेवारीला मॉस्को विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. याआधी त्यांनी काही व्हिडिआे जारी केले होते. पुतीन यांच्याकडे आलिशान बंगला आहे. ते तेथे भोगविलास करत असल्याचा आरोप या व्हिडिआेतून करण्यात आला होता.

इतिहास : नोविचोक ७० वर्षांपूर्वी केले होते तयार, चौथ्या पिढीतील प्रणाली
नोविचोकला १९६० ते १९७० च्या दशकात तयार केले होते. रशियात रासायनिक विषप्रयोगाची यंत्रणा आहे. हा कार्यक्रम फॉलेंटच्या साहाय्याने तयार केला. १९९० च्या आधी जगाला या नर्व्ह एजंटबद्दल माहिती झाली. रशियन संशोधक डॉ. विल मिर्जानोव्ह यांनी ‘स्टेट सिक्रेट्स’मध्ये त्याचा उल्लेख आहे.

दावा : महिलांवर सरकारी पैसा उधळतात पुतीन, त्यांची एक मुलगीही
पुतीन काही महिलांवर सरकारी खजिन्यातील पैसा उधळतात. या महिलांमध्ये पुतीन यांची गर्लफ्रेंड, त्यांची माजी पत्नी व त्यांची १७ वर्षीय एलिझावेटाचादेखील समावेश आहे. लुइझा नावानेही ती आेळखली जाते. लुइझाने सोशल मीडियावर छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

कट : विरोधी नेत्यांना चहातून विष दिले
सर्गी स्क्रिपल : ४ मार्च २०१८ रोजी विष देण्यात आले.
अॅलेक्झांडर पेरेपीलिछनी : २०१२ मध्ये चहातून विष दिले.
व्लादिमीर कारामुर्जा : २०१५ ते २०१७ दरम्यान अनेक वेळा विषप्रयोगाचा प्रयत्न.
अॅलेक्झांडर लितविनेंको : ग्रीन टीमध्ये पोलोनियम हा विषारी घटक दिला होता

बातम्या आणखी आहेत...