आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील टेक्सास:तेलासाठी प्रचंड ड्रिलिंग; पाच वर्षांत 8 पट वाढले भूकंप

मिडलँड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाशी छेडछाड म्हणजे पलटवारही ठरू शकतो. अमेरिकेतील टेक्सासमध्ये कच्चे तेल काढण्यासाठी ड्रिलिंगचा दुष्परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये दरवर्षी तेलाच्या हव्यासाने मोठे उत्खनन-उपसा केला जातो. त्यासाठी ठिकठिकाणी पम्पजॅक लावले जातात. या पम्पजॅकच्या साह्याने भूगर्भातील कच्चे तेल काढले जाते. त्यास हायड्रॉलिक फ्रॅॅकिंग म्हटले जाते. या तंत्रात पाणी आणि मातीच्या मिश्रणाला वेगाने भूगर्भात टाकले जाते. त्यामुळे पृथ्वीची भौगोलिक संरचना विस्कटू लागते. त्यात असंतुलन निर्माण होते. अशा कृतीमुळे भूगर्भीय हालचालींवर परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका अभ्यासानुसार २०१७ ते २०२१ दरम्यान ३ ते ८ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप झाल्याची नोंद आहे. भूकंप वाढत असल्याने मिडलँडची आता ‘भूकंप राजधानी’ म्हणून ओळख झाली आहे.

20 अब्ज बॅरल तेलाचा साठा टेक्सासच्या सर्वात मोठ्या तेल उत्खनन क्षेत्र वुल्फ भागात 15 वर्षांत अमेरिकेतील भूकंपांचे प्रमाण केवळ तीन टक्क्यांनी वाढल्याची नोंद आहे.

बातम्या आणखी आहेत...