आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइटलीच्या मिलान शहरात गुरुवारी मोठा स्फोट झाला. यानंतर काही वाहनांना आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका व्हॅनमध्ये झाला. परिसर सील करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या स्फोटात नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग आणि धूर दुरूनच बघायला मिळत आहे.
गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग
इटालियन वृत्तपत्र 'ला रिपब्लिका'च्या वेबसाईटनुसार - ज्या व्हॅनमध्ये स्फोट झाला त्यात काही गॅस सिलिंडर डिलिव्हरीसाठी ठेवण्यात आले होते. ही व्हॅन पार्किंगमध्ये नेली जात असताना सिलेंडरचा स्फोट झाला. सध्या एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जवळची शाळा आणि एक नर्सिंग होम रिकामा करण्यात आला आहे. चार गाड्यांना आग लागली, ती आटोक्यात आली आहे.
जर्मनीतही मोठा स्फोट, अनेक जखमी
जर्मनीतील रेटिंगेन शहरात गुरुवारी दुपारी एका निवासी इमारतीत स्फोट झाला. यामध्ये 10 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, घटनास्थळी उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की बचावासाठी इमारतीवर हेलिकॉप्टर पाठवण्यात आले असून परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
जगभरातील स्फोटाच्या इतर बातम्या
टेक्सासमध्ये झालेल्या स्फोटात 18,000 गायींचा मृत्यू
अमेरिकेतील टेक्सास येथील एका डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटात 18,000 गायींचा मृत्यू झाला. अमेरिकेतील कोणत्याही राज्यात पहिल्यांदाच एवढ्या गायींचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. डिमिट शहरातील साउथ फोर्क डेअरीमध्ये यंत्रसामग्रीच्या बिघाडामुळे स्फोट झाला.
अफगाण परराष्ट्र मंत्रालयाबाहेर स्फोट
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर सोमवारी मोठा स्फोट झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.