आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी रात्री किनाऱ्यावर उभ्या एका जहाजात मोठा स्फोट झाला. हे जहाज फटाक्यांनी भरलेले होते. स्फोट इतका भीषण होता की 10 किमीच्या परिघात असलेल्या घरांचे नुकसान झाले. या स्फोटामुळे कार तिसऱ्या मजल्यापर्यंत उडाल्या होत्या. इमारती एका क्षणात कोसळल्या.
स्फोटामुळे 10 किमी पर्यंतच्या घराचे नुकसान
आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, या घटनेत 73 लोकांचा मृत्यू झाला तर 3700 पेक्षा अधिक जखमी झाले. या स्फोटामुळे 10 किलोमीटरपर्यंतच्या घरांचे नुकसान झाले. घटनास्थळापासून अनेक किलोमीटर दूर राहणाऱ्या रानिया मसरी यांनी सांगितले की, ''स्फोट इतका गंभीर होता की घराच्या खिडक्या तुटल्या. मला वाटलं की हा भूकंप आहे.''
बंदरात अमोनियम नायट्रेट मोठ्या प्रमाणात होते : इंटेरियर मंत्री
इंटेरियर मंत्र्यांनी स्थानिक मीडियाला या घटनेबद्दल सांगितले की, बंदरात मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट होते. बंदरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट काय करत होते याबाबत लेबनान कस्टमकडे विचारणा केली जावी. दुसरीकडे, लेबनीजचे प्रसारक मायडेन यांनी कस्टमच्या संचालकांच्या हवाल्याने सांगितले की जवळपास एक टन नायट्रेटचा स्फोट झाला आहे.
रॉकेट स्ट्राईक किंवा स्फोटकांनी जहाज उडवल्याचा आरोग्य मंत्र्यांना संशय
यापूर्वी लेबनीजच्या आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले की, स्फोटाचा आवाज देशभरात ऐकला गेला आहे. ज्या प्रकारचा हा स्फोट आहे, त्यानुसार रॉकेट स्ट्राइकद्वारे किंवा स्फोटकांनी जहाज उडवल्याचा आम्हाला संशय आहे. हे हेतुपुरस्सर केले गेले असेल किंवा त्याचे काहीतरी वेगळे कारण असू शकते.
मोठ्या संख्येने लोक जखमी
स्थानिक न्यूज चॅनेल एलबीसीने आरोग्य मंत्र्यांच्या हवाल्याने सांगतिले की, या घटनेत मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. बरेच नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत स्फोट झाल्यानंतर शहरातील अनेक भागात धुराचे लोट पसरल्याचे दिसते. जवळपास राहणाऱ्या लोकांनी सांगितले की या स्फोटामुळे खिडक्या फुटल्या आणि एका घराचे छतही पडले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.