आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्लामाबाद:मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला 15 वर्षांची कैद, तीन लाखांचा दंडही

इस्लामाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लखवीची अटक म्हणजे नाटक : भारत

पाकिस्तानच्या दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयाने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड व लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या जकी-उर-रहमन लखवीला १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लखवीला तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

लाहोरच्या न्यायालयासमोरील खटल्यात तो दोषी ठरला आहे. एका रुग्णालयाला मिळणारा निधी दहशतवाद्यांकडे वळता केल्याच्या प्रकरणात लखवी दोषी आढळला. यासंबंधी एक तपास अधिकारी म्हणाले, लखवीला दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात नव्हे, तर रसदपुरवठा केल्यावरून शिक्षा झाली आहे. मुंबई हल्ल्यात त्याला २००८ मध्ये अटक झाली होती. मात्र पुढे त्याची जामिनावर सुटका झाली होती. आता त्याला गेल्या शनिवारी अटक झाली होती.

एफएटीएफचा दबाव :
दहशतवाद्यांना पैसा पुरवठा करण्याच्या प्रकरणांवर निगराणी ठेवणारी जागतिक संस्था एफएटीएफची पुढील महिन्यात बैठक होणार आहे. त्यात पाकिस्तानचा ग्रे यादीत समाविष्ट करण्यावर विचार केला जाणार आहे. परंतु पाकिस्तान दहशतवाद्याचे पोषण करत नसल्याचे मान्य करून २७ अटींची पूर्तता करत असल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले जाईल. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये एफएटीएफच्या बैठकीत पाकिस्तानला अटींची पूर्तता करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. पाकिस्तानने २७ पैकी २१ अटींची पूर्तता केली. आणखी सहा अटी पूर्ण करणे बाकी आहे.

लखवीची अटक म्हणजे नाटक : भारत
लखवीच्या अटकेवर भारताने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. हे नाटक असल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानात अशी अटक सामान्य गोष्ट आहे. एफएटीएफच्या बैठकीच्या तोंडावर ही कारवाई झाली आहे. जुलै २०१९ मध्ये पाकिस्तानने बैठकीच्या अगदी तोंडावर हाफिज सईदला अटक केली होती. यादरम्यान जागतिक संस्था पाकला काळ्या यादीत टाकण्याचा विचार करत होती. लखवीला अटकेचे ढोंग केल्यास देशाला ग्रे यादीतून वगळण्याची अपेक्षा आहे. परंतु हे नाटक जगाला ठाऊक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...