आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पाकिस्तान:लाहोरमध्ये मौलवीने गुरुद्वाराची जमीन घेतली ताब्यात, पाकिस्तान मुसलमानांचा देश असल्याचा दावा

इस्लामाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'व्हिडिओ काढत शिखांना धमकी, पाकिस्तान इस्लामी देश आहे'

पाकिस्तानात कट्टरपंथीयांची हिंमत वाढत चालली आहे. ताजी घटना लाहोरची आहे. एका मौलवीने गुरुद्वाराच्या जमिनीवर ताबा मिळवला. त्याने व्हिडिओ काढत शिखांना धमकी दिली की पाकिस्तान इस्लामी देश आहे. येथे केवळ मुस्लिम राहू शकतील. मौलवी सोहेल बट्ट दावत ए इस्लामी (बरेलवी) शी संबंधित आहे. तो लाहोरमध्ये हजरत शाह काकू चिश्ती दर्ग्याची देखरेख करतो. त्याने स्थानिकांच्या मदतीने गुरुद्वारा शहीद भाई तारूसिंगची जमीन ताब्यात घेतली. त्यानंतर पाकिस्तान गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (पीजीपीसी) चे माजी अध्यक्ष गोपालसिंग चावला यांनाही व्हिडिओ पाठवून धमकी दिली.

गोपाल चावला यांनी गेल्या वर्षी श्री निसाल साहेब (शीख प्रतीक) फडकावले होते. सोहेलने दावा केला आहे की, गुरुद्वारा आणि परिसरातील जमीन हजरत शाह काकू चिश्ती दर्गा आणि शहीदगंज मशिदीची आहे. सूत्रांनी सांगितले की, सोहेलने हे सर्व भूमाफियांच्या इशाऱ्यावर केले आहे. यात एक आयएसआयचा अधिकारी जेन साबचाही समावेश आहे.