आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात जन्मले बाळ!:काबूनलहून एअरलिफ्ट केलेल्या महिलेला विमानातच झाल्या प्रसूती वेदना, अमेरिकन हवाई दलाने जर्मनीत इमर्जन्सी लँडिंग करत केली डिलिव्हरी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानातून रेस्क्यू केलेल्या करण्यात आलेल्या एका महिलेने अमेरिकन विमान सी -17 ग्लोबमास्टरमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या महिलेला इतर लोकांसह अमेरिकेत नेले जात होते. महिलेला घेऊन जाणाऱ्या ग्लोबमास्टर विमानामध्येच महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. हवेचा दाब वाढल्यानंतर वैमानिकाने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला आणि यूएस हवाई दलाच्या जवानांनी जर्मनीतील रामस्टीन एअर बेसवर विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले.

लँडिंग करताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विमानातच महिलेची प्रसूती केली. अमेरिकन हवाई दलाने ट्विट केले की, महिला आणि मूल दोघेही सुखरुप आणि निरोगी आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधील काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताबा मिळवला आहे. शनिवारी अमेरिकन प्रशासनाने सांगितले की त्यांच्या हवाई दलाने आतापर्यंत 17 हजारांहून अधिक लोकांची सुटका केली आहे.

तुर्की सैनिकांनी 2 महिन्यांच्या मुलीला दूध पाजले होते
21 ऑगस्टलाही काबूल विमानतळावरून अशी चित्रे बाहेर आली, ज्याने सर्वांची मने जिंकली. तुर्की सैनिक येथे तैनात होते. तिथे त्यांना एक व्यक्ती 2 महिन्यांच्या मुलीसोबत भटकताना दिसला होता. मुलगी भुकेने त्रस्त झालेली दिसत होती. चौकशी केली असता, त्या व्यक्तीचे नाव फरिश्ता रहमानी असल्याचे उघड झाले. तालिबानपासून बचावासाठी पळा-पळ करण्यामध्ये त्याची पत्नी अली मुसा रहमानी मागे राहिली आणि तो मुलासह काबूल विमानतळावर पोहोचला.

तुर्की सैनिक मुलगी आणि वडिलांना घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते. मुलीला आंघोळ घातल्यानंतर त्यांनी तिला दूध दिले. त्यानंतर त्यांनी मुलाला वडिलांच्या स्वाधीन केले. काबुल विमानतळावर तुर्की सैनिक सतत लोकांना मदत करत आहेत, ते लोकांना अन्न आणि पाणी पुरवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...