आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. एससीओत भारत, चीन व पाकसह 8 स्थायी सदस्य आहेत. भारताच्यावतीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बैठकीत सहभागी झाले. पाकतर्फे बिलावल भुट्टो झरदारी नेतृत्व करत आहेत.
या बैठकीत 2 महत्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. जयशंकर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी भेटण्याची शक्यता आहे. त्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावावर चर्चा होऊ शकते. जयशंकर पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनाही भेटण्याची शक्यता आहे. सप्टेबरमध्ये एससीओच्या राष्ट्राध्यक्षांची परिषद होणार आहे.
जयशंकर यांच्या 3 महत्वाच्या बैठकांवर नजर
जयशंकर मुत्तकी यांनाही भेटणार?
या बैठकीत अफगाणिस्तान, बेलारूस, इराण व मंगोलिया हे चार निरिक्षक देशही सहभागी होणार आहेत. अफगाणच्या तालिबानी राजवटीला अद्याप कोणत्याही देशाने मान्यता दिली नाही. मोदी सरकार प्रत्येक पातळीवर अफगाणची मदत करत आहे. त्यामुळे जयशंकर अफगाणचे काळजीवाहू परराष्ट्र मत्री आमिर खान मुत्तकी यांना भेटतील असा दावा केला जात आहे. भारत सरकार व तालिबानमधील ही पहिली उच्चस्तरीय भेट असेल.
सप्टेबर महिना महत्वाचा
SCO साठी सप्टेबर महिना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सर्वच 8 देशांचे राष्ट्राध्यक्ष उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये एकत्र येतील. 15 व 16 सप्टेबरपर्यंत हे संमेलन चालेल. या बैठकीत चीनची राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीनही सहभागी होणार आहेत.
पाकच्या तज्ज्ञांनी बॅकडोअर डिप्लोमसी व अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाक समकक्ष शाहबाज शरीफ यांची भेट होईल असा दावा केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.