आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणीला भेटू शकली नाही मेघन:प्रिंस चार्ल्स यांनी हॅरीला एकटेच येण्याची केली होती सूचना; निकटवर्तीयांनाच मिळाली एंट्री

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर प्रिंस हॅरी एकटेच स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसलला पोहोचले होते. पत्नी मेघन मर्केल त्यांच्यासोबत नव्हत्या. त्यामुळे त्या महाराणी एलिझाबेथ यांना अंतिमवेळी पाहण्यासाठी का पोहोचल्या नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका वृत्तात मेघन मर्केल दुःखाच्या या प्रसंगात शाही कुटुंबासोबत असू नये अशी किंग चार्ल्स-तृतीय यांची इच्छ होती असा दावा करण्यात आला आहे. द सनच्या वृत्तानुसार किंग चार्ल्स -तृतीय यांनी प्रिंस हॅरीला मेघनला बाल्मोरल कॅसलला घेऊन न येण्यास मनाई केली होती.

मेघनचे स्वागत केले जाणार नाही

'महाराणीच्या अंतिम समयी केवळ कुटुंबातील निकटवर्तीयांनाच येण्याची परवानगी आहे. तुझा मोठा भाऊ प्रिंस विल्यम याची पत्नी केटही बाल्मोरल कॅसलला येणार नाही. त्यामुळे मेघनचेही येथे येणे योग्य नाही. तिथे तिचे कोणतेही स्वागत केले जाणार नाही,' असे प्रिंस चार्ल्स यांनी हॅरीला सांगितले होते.

महाराणी आजारी असल्याचे वृत्त मिळाले तेव्हा प्रिंस विल्यमची पत्नी केट मुलांसह इंग्लंडमध्येच होती. ती ब्लामोरल कॅसलला गेली नाही.
महाराणी आजारी असल्याचे वृत्त मिळाले तेव्हा प्रिंस विल्यमची पत्नी केट मुलांसह इंग्लंडमध्येच होती. ती ब्लामोरल कॅसलला गेली नाही.

प्रिंस हॅरी एकटेच भेटण्यासाठी पोहोचले

द सनच्या वृत्तानुसार, हॅरी स्कॉटलंडला जाण्यासाठी एकटेच विमानतळावर पोहोचले होते. तर प्रिंस विल्यम, प्रिंस अँड्र्यू, प्रिंस एडवर्ड व त्यांची पत्नी सोफी एकाच कारमधून विमानतळावर पोहोचले होते. त्यानंतर हॅरी खासगी विमानाने बाल्मोरल कॅसल पोहोचले. पण तोपर्यंत महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाले होते. त्यानंतर ते एका कमर्शिअल फ्लाइटने लंडनला पोहोचले होते.

हॅरींनी पत्नीसाठी शाही कुटुंबाला दिली होती सोडचिठ्ठी

प्रिंस चार्ल्स व प्रिंसेस डायनाचे छोटे सुपुत्र असणाऱ्या प्रिंस हॅरी यांनी मेघन हिच्यासोबत 9 जानेवारी 2020 रोजी शाही कुटुंबापासून विभक्त झाले होते. ते ब्रिटनहून अमेरिकेले गेले. या जोडप्याने एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत शाही कुटुंबापासून विभक्त होणे अत्यंत कठीण अनुभव होता, असे कबूल केले होते. यावेळी त्यांनी आपल्या मातोश्री प्रिंसेस डायना यांचीही आठवण काढली होती.

7 मार्च 2021 रोजी प्रिंस हॅरी व मेघन यांनी एक मुलाखत दिली होती. त्यानंतर राजघराण्याला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यांनी रॉयल फॅमिलीवर आपले पुत्र आर्चीला प्रिंस न बनवण्याचा आरोप केला होता. त्याच्या जन्मापूर्वी शाही कुटुंबीयांना तो कृष्णवर्णीय होण्याची भीती वाटत होती, असेही ते म्हणाले होते.
7 मार्च 2021 रोजी प्रिंस हॅरी व मेघन यांनी एक मुलाखत दिली होती. त्यानंतर राजघराण्याला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यांनी रॉयल फॅमिलीवर आपले पुत्र आर्चीला प्रिंस न बनवण्याचा आरोप केला होता. त्याच्या जन्मापूर्वी शाही कुटुंबीयांना तो कृष्णवर्णीय होण्याची भीती वाटत होती, असेही ते म्हणाले होते.

माझ्या आईची म्हणजे प्रिंसेस डायना यांची स्थिती किती वाईट असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही, असे हॅरी म्हणाले होते. हॅरी यांची पत्नी मेघन फिल्म स्टार होती. त्या नॉन ब्रिटीश आहेत. त्यांच्या राहणीमानामुळे अनेकदा त्यांचे शाही कुटुंबासोबत खटके उडाले. यामुळे हॅरी यांनी शाही कुटुंबापासून विभक्त होण्याचा मार्ग निवडला.

बातम्या आणखी आहेत...