आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणने लेखक मेहदी बहमनला दिला मृत्यूदंड:हेरगिरीचा ठपका, इस्त्रायलच्या वृत्त वाहिनीवरून सरकारवर केली होती टीका

तेहरान25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमधील हिजाब विरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर तेथील सुप्रसिद्ध लेखक मेहदी बहमन यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मेहमदी बहमन यांनी इस्त्रायलच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी इराण सरकारवर तिखट टीका केली होती. इराणने या मुलाखतीनंतर तत्काळ बहमन यांना अटक केली होती.

बहमन यांनी आपल्या मुलाखतीत इराणमध्ये इस्लामिक कायदा लागू करण्याचा निषेध केला होता. तसेच इस्त्रायल व इराणमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावरही जोर दिला होता.

मेहदी बहमन यांनी एका धर्मगुरूच्या मदतीने अनेक धार्मिक आर्ट वर्क्सवर काम केले होते.
मेहदी बहमन यांनी एका धर्मगुरूच्या मदतीने अनेक धार्मिक आर्ट वर्क्सवर काम केले होते.

मेहदी बहमनवर हेरगिरीचा आरोप

मेहदी बहमन इराणचे सुप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी शिया धर्मगुरू मासुमी तेहरानी याच्यासोबत अनेक धर्मांशी संबंधिति आर्टवर्कवर काम केले आहे. इराणने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला होता.

मेहदी बहमन यांना ज्या मुलाखतीसाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, ती मुलाखत त्यांनी हिजाबविरोधी निदर्शने सुरू होण्यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये दिली होती. यासंबंधीच्या वृत्तानुसार, त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी हिजाबविरोधी निदर्शनांचा वापर करण्यात आला.

इराणमधील निदर्शनांत 500 हून अधिक बळी

इराणमद्ये गतवर्षी 22 सप्टेंबर रोजी महासा अमिनी नामक तरुणीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात हिजाब विरोधी निदर्शने सुरू झाली होती. या निदर्शनांत आतापर्यंत 500 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. यात 69 मुलांचाही समावेश आहे. इराण या निदर्शकांना सूळावर चढवत आहे. एमनेस्टी इंटरनॅशनलच्या माहितीनुसार, इराणमध्ये आतापर्यंत 26 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

इराणमधील आंदोलनासंबंधीच्या इतर बातम्या वाचा...

माझ्या मृत्यूनंतर कुराण वाचू नका, जल्लोष करा:इराणमध्ये शिक्षा होण्यापूर्वी हिजाबविरोधी कार्यकर्त्याचा शेवटचा संदेश, सार्वजनिकपणे दिली फाशी

इराणमध्ये हिजाबला विरोध करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. हे प्रकरण 12 डिसेंबरचे आहे. मात्र, आता त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ तरुणाला फाशी देण्याआधीचा आहे. यामध्ये तो लोकांना 'माझ्या मृत्यूनंतर कुराण वाचू नका, जल्लोष करा' असे सांगत असल्याचे दिसून येत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

पिअर्सिंग इस्लामबाह्य असल्याचा दावा करत मला रस्त्यावर मारले:इराण सरकारचा भरवसा नाही, आंदोलन संपवण्यासाठीच सदाचरण पोलिस रद्द

'त्यांनी (सदाचरण पोलिसांनी) मला मेट्रो स्टेशनजवळ पकडले, मारहाण करण्यास सुरुवात केली. मी पिअर्सिंग केली होती. त्यांच्या मते ते गैर-इस्लामी होते. मी नीट कपडेही घातलेले नाही, असे म्हणत त्यांनी मला मारहाण केली.'

26 वर्षीय डोन्या फर्द ही इराणी महिला हे सांगताना घाबरून रडू लागते. ती म्हणते- 'माझ्या आईलाही तुरुंगात नेले होते, त्याला री-एज्युकेशन सेंटर म्हणत. तिथे ते त्यांना रोज मारायचे, फटके मारायचे.' येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...