आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा हिरे व्यावसायिक मेहुल चोकसी कॅरेबियन बेट डोमिनिकन रिपब्लिकमध्ये अवैध प्रवेश प्रकरणात आरोपमुक्त झाल्यानंतर अँटिग्वात पोहोचला आहे. तो अँटिग्वात पोहोचल्याबाबत तेथील पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी मौन सोडले आहे. ते म्हणाले की, चोकसी अँटिग्वा-बारबुडाचा नागरिक नसता तर त्यांच्या सरकारने त्याला भारतात पाठवण्यास वेळ वाया घालवला नसता. अँटिग्वा संस्थांच्या सूत्रांनुसार, चोकसीने अँटिग्वा-बारबुडाच्या मुख्य विरोधी पक्षासोबत करार केला आहे. त्याने निवडणुकीत पैसा पुरवला. त्या बदल्यात विरोधी पक्षाने त्याला सुरक्षेचे आश्वासन दिले. चौकशीत सहभागी एका अधिकाऱ्याने सांगितले की, चोकसीच्या अटकेनंतर यूपीपीने नियमित पत्रकार परिषदेत चोकसीच्या सुटकेसाठी अभियान चालवले. चोकसीने मोठी गुंतवणूक करून अँटिगुआचे नागरिकत्व घेतले आहे. त्यामुळे त्याची सुटका केली जावी आणि कोणत्याही स्थितीत भारतात पाठवले जाऊ नये,अशी मागणी विरोधी पक्ष यूपीपीने सरकारकडे वारंवार केली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत डोमिनिकन कोर्टाने चोकसीचा युक्तिवाद मान्य केला की, त्याला अँटिगुआतून डोमिनिकनला आणले होते. यानंतर विधी अंमलबजावणी विभागाशी संबंधित एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चोकसीने निवडणुकीत विरोधी पक्षाला फंडिंग केले होते. तुमच्या लक्षात असेल, कारण चोकसीला गेल्या वर्षी अटक केले होते तेव्हा अँटिगुआ सरकारने म्हटले होते की, चोकसीचे नागरिकत्व रद्द करून भारतात पाठवले जाईल. सरकारने नागरिकत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली होती, मात्र यूपीपीने या प्रस्तावाला विरोध केला आणि लोकांना याविरोधात न्यायालयात जाण्यासाठी चिथावले.
भारतीय एजंटांवर चोकसीच्या अपहरणाचे आरोप : चोकसीच्या अपहरणाबाबत अँटिगुआच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असे की, त्याला भारतात नेण्याच्या प्रयत्नाअंतर्गत भारतीय एंजंट्सनी त्याचे अपहरण करून डोमिनिकनला नेले होते. मात्र, त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाआधी चोकसीच्या वकिलांनी गुन्हा दाखल केला आणि ही योजना फसली.अँटिगुआच्या अधिकाऱ्यांनुसार, गेल्या वर्षी २३ जुलैच्या सायंकाळी एका अपार्टमेंटमधून चोकसीचे अपहरण केले. तिथे तो आपला मित्र बारबरा जराबिकाला भेटायला गेला होता. तेथून त्याला बोटीतून डोमिनिकाला नेण्यात आले आणि तेथेच पोलिस त्याच्या अटकेसाठी वाट
पाहत होते.
चोकसीचे अपहरण कसे झाले सरकारने सांगावे : विरोधी पक्ष
विरोधी पक्षाच्या सदस्याने लढवली चोकसीची केस
अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी विरोधकांना घेरत दावा केला होता की, चोकसीचे नवे वकील व यूपीपीचे सदस्य जस्टिन सायमन चोकसी आणि पक्षामधील कडी आहे. त्यामुळे चोकसी अँटिग्वात राहावा, तिथे घटनात्मक संरक्षणामागे सुरक्षित राहावा असे विरोधकांना वाटते. चोकसीच्या सुटकेनंतर विरोधी पक्ष चोकसीच्या अपहरणावरून सरकारला घेरत आहे. यूपीपीचे नेते हेरोल्ड लोवेल म्हणाले, सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे.
विरोधकांच्या दबावानंतर पीएम ब्राऊन बॅकफूटवर विरोधकांच्या दबावानंतर पंतप्रधान ब्राऊनही बॅकफूटवर येताना दिसत आहेत. त्यांनी हल्लेखोर विरोधकांच्या आरोपांवर सांगितले की, त्यांच्या सरकारने चोकसीच्या अपहरणात कोणतीही मदत केली नाही. पीएम ब्राऊन म्हणाले, हे खरे आहे की, मी अनेकदा सार्वजनिकरीत्या चोकसीला डोमिनिकातून थेट भारतात पाठवू, हे म्हणालो होतो. त्याने बेट सोडले आहे, हा याचा आधार होता. तेव्हा मला अपहरणाचा अंदाज नव्हता.
कॅरेबियन बेटांची भीती : गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्यास सुरुवात झाल्यास अब्जावधी डॉलरचा उद्योग नष्ट होईल
कॅरेबियन बेटांवर गुन्हेगारांना संरक्षण देणारा अब्जावधी डॉलरचा उद्योग फुलत आहे. या विषयाचे तज्ज्ञ एन. मार्लो यांच्या चौकशीनुसार ३० पेक्षा जास्त देशांत नागरिकत्वाच्या समान योजना आहेत. मात्र,या बेटांच्या ऑफर जास्त आकर्षक आहेत. हे नागरिकत्व घेणे खूप स्वस्त आहे. यासोबत व्यक्तीला आपल्या पार्श्वभूमीची माहिती द्यावी लागत नाही. पूर्व कॅरेबियन बेटांच्या प्रशासनाला भीती आहे की, त्यांनी प्रत्यार्पण सुरू केल्यास अब्जावधी डॉलर्सचा उद्योग उद्ध्वस्त होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.