आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइटलीच्या पहिल्या कट्टरवादी पंतप्रधान जाॅर्जिया मेलाेनी यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केवळ दाेन आठवड्यांत त्यांचे सरकार वादात सापडले आहे. मेलाेनी यांचे निर्णय हे या वादामागील कारण ठरले आहे.मेलाेनी यांनी सर्वात आधी नाझी स्वस्तिक प्रतीकाचा आर्मबँड घालणारे नेते गलॅजाे बिग्नामी यांना मंत्री केले. गलॅजाे यांचा असे प्रतीक घातलेला फाेटाे २००५ मध्ये झळकला हाेता. त्यांनी माफी मागितली आहे. परंतु फलाेग त्यांच्या नियुक्तीला विराेध करत आहेत. या विराेधामुळे मेलाेनी यांनी काेविडची लस न देणाऱ्या डाॅक्टरांवरील बंदी हटवली आहे. कारण अशा डाॅक्टरांकडून संसर्ग हाेणे आणि संसर्गाचा फैलाव हाेण्याचा धाेका जास्त आहे. मेलाेनी यांनी आणखी एक वादग्रस्त िनर्णय घेतला आहे. रेव्ह पार्ट्यांवर त्यांनी बंदी घातली आहे. नव्या कायद्यामुळे रेव्ह पार्टी व बेकायदा डीजे म्युझिक पार्ट्या राेखता येऊ शकतील, असा मेलाेनी सरकारचा दावा आहे. अशा प्रकरणात आयाेजकांना तीन ते सहा वर्षांपर्यंतची शिक्षा हाेऊ शकते. रेव्ह पार्ट्यांतून नशापान वाढू शकते, लैंगिक शाेषणाच्या गुन्ह्याची देखील शक्यता असते. परंतु राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांवर या नव्या कायद्यामुळे गदा येते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नवा कायदा अस्पष्ट स्वरूपाचा असल्याने त्याच्या आडून इतर सार्वजनिक सभा राेखण्याची कामेही हाेतील. यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याच्या हक्काची पायमल्ली हाेईल.
दिशाभूल करण्यासाठी मेलाेनींचा खटाटाेप देशासमाेरील माेठ्या प्रकरणांकडून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी मेलाेनी असे मुद्दे उकरून काढत आहे. विश्लेषक फ्रान्सिस्काे कँसेलाटाे म्हणाले, देशाची तिजाेरी रिकामी आहे. हीच मेलाेनी यांची माेठी समस्या आहे. सरकार पुढील वर्षीच्या बजेटमधील तूट जीडीपीच्या ३.४ ने वाढवून ४.५ करणार आहे. महागाई वाढू लागली आहे. वीज देयके कमी केली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.