आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन लाइट थेरपी:डोळ्यातून मेलानोप्सिन अॅसिड मेंदूत जाऊन वेदना शमवते, दुखणे 77% कमी होते

अमेरिकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत ५ कोटींहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत. ते थेरपी, मसाज, अॅक्युपंक्चर आणि औषधीही घेत आहेत. मात्र वेदना संपत नाहीत. अनेक औषधांची तर सवयच लागते. नुकत्याच लागलेल्या ड्यूक युनिव्हर्सिटीच्या शोधात ग्रीन लाइटमध्ये काही वेळ घालवल्यास प्रत्येक प्रकारची वेदना कमी वा मुळापासून नष्ट होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. त्याला ग्रीन लाइट थेरपी असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याचे काहीच दुष्परिणाम नाहीत. कोणतीही सवय लागत नाही.

प्रमुख शोधकर्ते डॉक्टर पद्मा गुलूर यांनी फायब्रोमायल्गियाच्या (स्नायूतील वेदना) रुग्णांवर एक प्रयोग केला. दोन आठवड्यांपर्यंत दरदिवशी ४ तास वेगवेगळ्या रंगांचे चष्मे घालायला दिले. काहींनी निळे, काहींनी विनारंगाचे तर काहींनी हिरव्या रंगाचे चष्मे घातले. हिरव्या रंगाचा चष्मा घालणाऱ्या लोकांमध्ये वेदना कमी झाल्या. त्यांनी वेदनाशामक औषधे घेणे कमी केले. पद्मा गुलूर यांनी सांगितले की, या संशोधनानंतर लोक इतके आनंदी होते की, त्यांनी चष्मे परत करायला नकार दिला. खरं तर हिरवा प्रकाश काही कोषिकांमधून आपल्या डोळ्यांच्या मार्गाने मेंदूमध्ये जातो. त्यातीलच काही आपल्या वेदनेवर नियंत्रण मिळवतात. डोळ्यातील मेलानोप्सिन अॅसिड हिरव्या रंगामुळे क्रियाशील होते. ते मेंदूतील वेदना कमी करणाऱ्या भागांना संकेत पाठवण्याचे काम करते. ते हिरव्या रंगामुळे क्रियाशील झाल्यानंतर मेंदूत वेदना कमी करणारा एक रस्ता तयार होतो.

हिरव्या प्रकाशामुळे ६०% कमी होतात मायग्रेनच्या वेदना एरिजोना युनिव्हर्सिटीचे डॉक्टर मोहम्मद इब्राहिम यांनी ग्रीन लाइटचा मायग्रेन पीडितांवर अभ्यास केला. त्यात मायग्रेनच्या तीव्र वेदना ६०% पर्यंत कमी झाल्याचे स्पष्ट झाले.वेदनेची तीव्रता ४०% पर्यंत राहिली.स्नायूंच्या वेदनाही कमी झाल्या.

बातम्या आणखी आहेत...