आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Melatonin In Dietary Supplements Makes Children Sick, Over 52,000 Complaints; Melatonin Sold As A Supplement In The United States |marathi News

तक्रार दाखल:डाएट सप्लिमेंटमधील मेलाटोनिनमुळे मुले आजारी, 52 हजारांवर तक्रारी; अमेरिकेत मेलाटोनिनची सप्लिमेंट म्हणून विक्री

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनिद्रेची तक्रार करणाऱ्या वयस्करांना मेलाटोनिन नावाचे केमिकल डाएट सप्लिमेंटच्या रूपाने दिले जाते. मेलाटोनिन शरीरातील झोपेच्या चक्राला नियंत्रित करण्यासाठी मदत करते. परंतु हेच केमिकल डाएट लहान मुलांसाठी अतिशय हानिकारक ठरू लागले आहे. मेलाटोनिन घेतल्याने मुले आजारी पडू लागली आहेत. झोपल्यानंतर मेटाबोलिझमची गती मंद होते. त्यामुळे मेलाटोनिनचे रूपांतर विषात होते. सामान्यपणे पालक मंडळी त्याचे लाभ लक्षात घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु अमेरिकेत ५२ हजारांवर पालकांनी याबद्दल आता तक्रार दाखल केली आहे. मुलाने चुकीने मेलाटोनिनचे सेवन केल्याने त्याची प्रकृती बिघडली.

१० वर्षांत २ लाख ६० हजार तक्रारी, २ मृत्यू
२०१२ ते २०२१ पर्यंत मुलांनी जास्त प्रमाणात मेलाटोनिन घेतल्याने २ लाख ६० हजारांहून जास्त तक्रारी आल्या आहेत. दहा वर्षांत सुमारे ४ हजार मुलांना मेलाटोनिनमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. पाच जणांना श्वसनाचा त्रास जाणवला. दोघांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...