आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया:262 दिवसांनंतर जगातील सर्वात दीर्घ लॉकडाऊनमधून मेलबर्नची मुक्तता

ऑस्ट्रेलिया3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहराला २६२ दिवसांनंतर लाॅकडाऊनमधून मुक्ती मिळणार आहे. जगातील सर्वात दीर्घ चाललेला लॉकडाऊन म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिले जाते. मेलबर्ननंतर सर्वाधिक दीर्घकाळ अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये २३४ दिवस लॉकडाऊन चालला हाेता.

व्हिक्टाेरिया प्रांताचे प्रमुख डॅनियल अँड्र्यूज यांनी यासंबंधी रविवारी घाेषणा केली. शुक्रवारपासून शहरातील सर्व प्रकारचे निर्बंध उठवले जातील. गुरुवारी रात्री ११ वाजून ५९ मिनिटानंतर काेणताही लॉकडाऊन लागू राहणार नाही. त्याशिवाय शहरात संचारबंदीदेखील राहणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. लाॅकडाऊन नियाेजित कालावधीच्या पाच दिवस अगाेदर हटवण्यात येत आहे. कारण व्हिक्टाेरियाने ७० टक्के लाेकांच्या बचावासाठी दाेन डाेस देण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे प्रांतातील नागरिक आपल्या सहाव्या लाॅकडाऊनमधून बाहेर पडल्याबद्दल जल्लाेष साजरा करू शकतात.

व्हिक्टाेरियाबराेबरच न्यू साऊथ वेल्समध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याची याेजना तयार केली जात आहे. पहिला टप्पा साेमवारपासून सुरू हाेणार आहे. तज्ज्ञ इशारे देत आहेत. मास्क परिधान करणे अनिवार्य आहे आणि पुरेशी हवा-प्रकाश असलेल्या शाळांनाच केवळ सुरू करण्याची परवानगी दिली जावी, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. न्यू साऊथ वेल्समध्ये १६ वर्षांहून जास्त वयाच्या ७५ टक्के लाेकांना लस देण्यात आली आहे.

मक्का मशिदीत आता शारीरिक अंतराचा नियम शिथिल
साैदी अरेबियातील पवित्र मक्का मशिदीत आता लाेक बिनदिक्कतपणे जाऊ शकतील. कारण सरकारने काेराेना लक्षात घेऊन शारीरिक अंतर राखण्याची नियम आता रद्द केला आहे. साेबतच मशिदीत कितीही संख्येने लाेकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जगभरातून दाखल हाेत असलेल्या भाविकांना आता प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही. मशिदीच्या फरशीवरील शारीरिक अंतर राखण्यासाठी तयार केलेेल्या खुणाही मिटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी मशिदीत हजाराे लाेकांनी प्रवेश केला हाेता. ते रांगेत दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...