आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकाळचे नऊ वाजताहेत..पाकिस्तानातील पंजाबच्या लाहाेर शहरातील ब्रेडलाॅफ हाॅलसमाेर मी उभा आहे. एकेकाळी हा हाॅल नॅशनल काॅलेजचा भाग हाेता. शहीद-ए-आझम भगतसिंग यांनी आपल्या क्रांतिकारक सहकाऱ्यांसह ‘नाैजवान भारत सभा’ स्थापन केली हाेती. सुमारे १०० वर्षांपूर्वी ‘मेरा रंग दे बसंती चाेला..’ आणि ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घाेषणा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची आेळख बनली हाेती. ब्रेडलाॅफ हाॅल असाे की इस्लामिक काॅलेज, फव्वारा चाैक असाे की सेंट्रल जेल..भगतसिंगांच्या आठवणींचा दरवळ चाेहीकडे जाणवू लागताे. त्यांची आठवण येथील इमारती, पुस्तके, दस्तएेवजापासून येथील लाेकांच्या मनापर्यंत वसलेली दिसते. अशाच लाेकांपैकी ९५ वर्षीय सलीम मलिकही आहेत. कृष्णानगरच्या एका गावात जन्मलेले मलिक म्हणाले, भगतसिंग दिलदार आणि निडर हाेते. इंग्रजाच्या डाेळ्याला डाेळे भिडवून बाेलत हाेते. त्यांच्याकडे बघून आम्ही शिक्षण घेत असतानाच स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालाे हाेताे. ते एखाद्या देशाचे, धर्माचे नव्हे तर संपूर्ण उपखंडाचे हीराे आहेत. तेव्हा देशाची फाळणी हाेईल, याची काेणाला कल्पनाही नव्हती.
फाळणीनंतर लुधियानातील मुलापूर गावातून पाकिस्तानला स्थलांतरित झालेले ८६ वर्षीय चचा अचा म्हणाले, लहानपणी माझे वडील आम्हाला भगतसिंगांच्या गाेष्टी सांगायचे. लाहाेरचे सैयदा भगत सिंगांच्या चाहत्यांपैकी. त्या दरवर्षी जयंती व शहीद दिन कार्यक्रम आयाेजित करतात. सैयदा म्हणाल्या, आम्ही तरुण पिढीच्या मनात भगत सिंग यांना जिवंत ठेवू इच्छिताे. लाहाेरमध्ये भगतसिंग यांचा जन्म झाला. शिक्षण झाले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी हसत-हसत फासावर जाणे पसंत केले. त्यांनी पिढ्यांना अन्यायाच्या विराेधात लढणे शिकवले. इतिहासतज्ज्ञ इक्बाल म्हणाले, शहराच्या मधाेमध असलेले इस्लामिक काॅलेज स्वातंत्र्य आंदाेलनाचा महत्त्वाचा भाग हाेते. भगत सिंग यांनी ब्रिटिश अधिकारी जाॅन सँडर्सवर याच ठिकाणी गाेळीबार केला हाेता. सेंट्रल जेलमध्ये भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली. नंतर तुरुंगांच्या ठिकाणी शादमान चाैक तयार करण्यात आला.
भगतसिंग यांच्याशी संबंधित कागदपत्रे सुरक्षित
भगतसिंग यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पाकिस्तानच्या संग्रहालयाला भेट दिली. १९१९ मध्ये भगतसिंगांवर दाखल एफआयआरचे कागदपत्र येथे सुरक्षित आहेत. हा एफआयआर शहरातील तत्कालीन काेतवाली पाेलिस ठाण्यात दाखल हाेता. भगतसिंग यांच्या पाेस्टमाॅर्टेम अहवालासह त्यांनी लिहिलेली पत्रेही येथे आहेत. मियांवली तुरुंगातून लाहाेर सेंट्रलमध्ये हलवण्यात यावे, अशी विनंती करणारे त्यांचे पत्रही आहे. हे पत्र १७ जून १९२९ मध्ये लिहिले हाेते. त्याशिवाय ‘बेजुबान दाेस्त,’ ‘गंगा दास डाकू’ इत्यादी पुस्तके आहेत. ही पुस्तके भगतसिंग वाचत हाेते. अर्काइव्हचे सचिव ताहिर युसूफ म्हणाले, आम्हाला माेकळ्या हवेत श्वास घेता येत आहे. भगतसिंग यांच्यामुळे हे शक्य झाले. आम्ही प्रदर्शन मांडताे. त्यात भगतसिंग यांच्याशी संबंधित कागदपत्रे मांडली जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.