आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या यंत्रमानवात अनेक त्रुटी दिसून येतात. त्यामुळे महिला तसेच पुरुषांमध्ये भेदभाव करतानाच वर्णभेदही करू लागतात. जाॅर्ज हापकिन्स विद्यापीठ, जाॅर्जिया युनिव्हर्सिटी आॅफ टेक्नाॅलाॅजी यांच्या संयुक्त प्रकल्पात झालेल्या संशाेधनात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. निकृष्ट न्यूरल नेटवर्क माॅडेलमुळे राेबाेट्स रूढिवादी गाेष्टी शिकू लागले आहेत. राेबाेट माणसाचा रंग पाहून त्यांच्या नाेकरीचा अंदाज लावू लागले आहेत. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा रंग काळा असल्यास ताे त्यांना ब्ल्यू काॅलर श्रमिक मानताे. त्याचबराेबर राेबाेट्स पुरुषांना महिलांच्या तुलनेत जास्त महत्त्व देतात. त्यांना समाजात बलाढ्य समजतात. जाॅर्जिया टेकचे लेखक अँड्रयू हंड्डू म्हणाले, आपण वंशवादी राेबाेटची एक पिढी तयार करण्याची जाेखीम घेत आहोत. परंतु कोणतीही संस्था हा मुद्दा उपस्थित करू इच्छित नाही. कारण त्यांना हे याेग्य वाटते. संशाेधक इंटरनेट डेटाचा वापर करून राेबाेटची निर्मिती करतात. त्यातूनच एआय प्राेग्रॅम तयार केला जाताे. त्यामुळे यंत्रमानवाला माणूस व इतर गाेष्टींत फरक करता येताे. इंटरनेटमधून डाऊनलोड केलेल्या डेटातून पक्षपाती सामग्री मिळते. तसे झाल्यास नव्या अल्गाेरिदममध्येदेखील ती समाविष्ट होते. त्यामुळे राेबाेटदेखील पक्षपातीपणा करू लागतात.
लोकांच्या वर्तनावर परिणाम करणे शक्य
विक्की जेंगाे म्हणाले, हा भेदभाव लोकांच्या घरी पाेहोचेल आणि त्यांच्या वर्तनावरही परिणाम होईल, असे दिसते. घरातील लहान मुलाने राेबाेटकडे लहान बाहुली हवी आहे, असा हट्ट धरल्यास कदाचित राेबाेट मुलाला पांढऱ्या रंगाची बाहुली देऊ शकताे. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होऊ शकताे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.