आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:विद्यार्थ्यांकडून मेंटल हेल्थ क्लिनिकचे समर्थन, पालक म्हणाले, आमच्या मुलांची फसवणूक केली जातेय

अमेरिकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गानंतर शाळकरी मुलांच्या मानसिक आरोग्यातील बदलामुळे अमेरिकेतील शाळांत मेंटल हेल्थ क्लिनिक उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकेच्या कनेक्टिकटमधील किलिंगली भागातील शाळेने हा प्रस्ताव धुडकावून लावत विरोध सुरू केला आहे. येथील शाळेत मेंटल हेल्थ क्लिनिक उघडण्यावरून आई-वडिल आणि किशोरवयीन मुले असे दोन गट बनले आहेत. किलिंगलीच्या शाळेत शिकणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी जिकोलेला म्हणाली की, मी सहावीत असताना मानसिक आजाराची शिकार झाले होते, पण आता मी ठीक आहे. शाळेत मानसिक आरोग्य क्लिनिक उघडले जावे अशी तिने शाळा प्रशासनाकडे मागणी केली होती. तथापि, जिकोलेलाची आई लीसा यांचे म्हणणे आहे की, लिंग ओळख आणि जन्म नियंत्रणासारखे मुद्दे कौटुंबिक असतात. मात्र, क्लिनिकमुळे मुलांची फसवणूक होऊ शकते. मार्चमध्ये किलिंगली बोर्डाच्या सदस्यांनी हा प्रस्ताव खारिज केला. पालक शाळांमध्ये मेंटल हेल्थ क्लिनिक उघडण्याची परवानगी शाळांना देईना झालेत. सुमारे १८ हजार लोकसंख्येच्या या शहरात श्रमिक वर्गाच्या लोकांची संख्या जास्त आहे. तर या शहरात मादक पदार्थांचे सेवन आणि आत्महत्या आदी विषय केवळ पादरी उचलतात. अशा वेळी शहरातील लोक मानसिक आरोग्याबाबत अदिक जागरूक नाहीत.

सर्व्हे : १४.७% मुलांनी आत्महत्येची योजना बनवली होती
किलिंगलीच्या १५७ शाळांत २०२१ मध्ये मानसिक आरोग्यावर झालेल्या सर्व्हेत २८.२% मुलांनी स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचा विचार केल्याचे समोर आले. १४.७%नी आत्महत्येची योजना बनवली. ४२% मुलांवरही थोडा परिणाम झाला.

बातम्या आणखी आहेत...