आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Mental Stress Is Also Dangerous For The Heart; This Can Lead To Blood Vessel Problems | Marathi News

दिव्य मराठी विशेष:मानसिक तणावही हृदयासाठी धोकादायक; त्यामुळे रक्तवाहिन्यांत समस्या निर्माण होते, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचे ते मोठे कारण : तज्ज्ञ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणाप्रमाणेच तणावही मोठे कारण

हृदयाच्या आजारांसाठी आपण उच्च रक्तदाब, जास्त कोलेस्टेरॉल, धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा व शारीरिक निष्क्रियता यांना मोठी जोखीम मानतो. डॉक्टरही हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि हार्ट अॅटॅक व स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी त्यांचीच तपासणी करण्याचा सल्ला देतात. पण डॉक्टर आयुष्यातील तणावाबाबत कमी विचारणा करतात. पण दीर्घकाळापासून असलेला तणाव या पारंपरिक जोखमींप्रमाणेच मोठा धोका आहे, असा दावा ताज्या अभ्यासात करण्यात आला आहे.

जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या (जामा) अभ्यासानुसार, हृदयाचे आरोग्य चांगले नसलेल्या लोकांत अॅटॅक, स्ट्रोक व कार्डियोव्हस्क्युलर आजारांसाठी शारीरिकपेक्षा मानसिक तणाव जबाबदार आहे. संशोधकांनी हृदयाच्या आजारांनी ग्रस्त ९०० पेक्षा जास्त लोकांच्या हृदयावर शारीरिक व मानसिक तणावाच्या परिणामांचा अभ्यास केला. त्यात असे आढळले की, मानसिक तणावामुळे हृदयाचा रक्तप्रवाह कमी झाल्याने हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे हार्ट अॅटॅक आणि त्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त असते. मानसिक तणाव हार्ट अटॅकसाठी कारणीभूत आहे या यापूर्वी झालेल्या अभ्यासातील निष्कर्षाला त्यामुळे दुजोरा मिळाला. ज्यांना उच्च पातळीचा मानसिक तणाव आहे, त्यांना धोका दुपटीपेक्षा जास्त होता, असे ५२ देशांतील २४ हजारपेक्षा जास्त लोकांवर झालेल्या अभ्यासात आढळले होते. कार्डिओलॉजिस्ट डॉ. मायकेल ओसबोर्न यांनी सांगितले की, तणाव वाढल्याने मेंदूचे भय केंद्र प्रतिक्रिया देते आणि हार्मोन रिलीज करण्यास उत्प्रेरित करते. त्यामुळे शरीरात फॅट, रक्तदाब आणि इन्सुलिन प्रतिरोधाची पातळी वाढते. वारंवार असे झाल्याने रक्तवाहिन्या सुजतात. त्यामुळे रक्तात गुठळ्या वाढतात आणि रक्तवाहिन्यांचे काम बाधित होते. परिणामी हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येतो.

झोपेच्या वेळी स्मार्टफोन आणि गॅजेट्सचा निळा प्रकाश टाळा : तज्ज्ञ
संशोधकांनुसार तणाव घटवणाऱ्या प्रोग्राम्समुळे फायदा मिळू शकतो. हे प्रोग्राम्स माइंडफुलनेस मेडिटेशन, योग आणि ताइ ची यांच्या मदतीने तणाव घटवतात. या उपायांमुळे शरीरातील पॅरासिम्पेथेटिक तंत्रिका यंत्रणा सक्रिय होते, त्यामुळे मन-मेंदूला शांतता मिळते. डॉ. ओसबोर्न सांगतात की, नियमित व्यायामाद्वारेही मानसिक तणाव घटवता येतो. पुरेशा झोपेमुळेही हृदयाची जोखीम कमी होते. झोपण्याची-उठण्याची वेळ निश्चित असावी. झोपेच्या वेळी स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा वापर टाळावा. त्यातून निघणारा निळा प्रकाश हीदेखील मोठी समस्या आहे.

बातम्या आणखी आहेत...