आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नाचे स्टेज सजलेले होते तेव्हा वधूच्या रूपातील “अवताराला’ मैत्रिणीने स्टेजच्या मध्यभागी आणले. वधू पोहोचल्याचे पाहताच वराचा अवतारही स्टेजवर पोहोचला आणि त्याने वेडिंग टोस्ट (लग्नाआधी दिला जाणारा शुभकामना संदेश) देऊन सोहळा सुरू केला. अंगठी घातल्यावर दोन्ही अवतारांनी सोबत नृत्य केले. एखाद्या व्हिडिओ गेमसारखे दिसणारे हे दृश्य आभासी (व्हर्च्युअल) लग्नाचे आहे. त्याचे सर्व विधीही आभासीच होते. मेटाव्हर्समध्ये झालेले हे लग्न अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात चर्चेत आहे. ही संकल्पना ५२ वर्षीय ट्रेसी आणि ६० वर्षीय डेव्ह गेगनॉन यांची होती. जे वैयक्तिकपणे समारंभाला येऊ शकत नव्हते त्या लोकांसाठी त्यांनी हा समारंभ लाइव्ह-स्ट्रीम केला. पाहुणे त्यात व्हर्च्युअली सहभागी झाले, भेटवस्तूही याच मोडमध्ये देण्यात आल्या.
ईएक्सपी रिअॅल्टीत एजंटच्या रूपात काम करत असलेले गेगनॉन दांपत्य प्रथम २०१५ मध्ये क्लाऊडवर अवतारामार्फतच भेटले होते. त्यामुळे लग्नही अशाच वातावरणात व्हावे अशी त्यांची इच्छा होती. कोरोनाकाळात प्रतिबंधांदरम्यान असे आयोजन लोकांनाही आवडले. अमेरिकेच्या प्लाझा हॉटेलचे व्हर्च्युअल व्हर्जन तयार करून मेटाव्हर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या ऑलसीटेड कंपनीचे सँडी हॅमर यांनी सांगितले की, ‘मेटाव्हर्स लग्नात हजारो पाहुण्यांना बोलावू शकता, अंतराळात लग्न होऊ शकते. पाहुण्यांना रॉकेटने घेऊन जाण्यासोबतच जगभरात फिरवू शकता. लग्नाची पार्टी इटलीमध्ये, तर रिसेप्शन पॅरिसमध्ये देऊ शकता.’
मेटाव्हर्स हे इंटरनेटवरील आभासी विश्व आहे. युजर्स ते पाहू शकतात. दुसऱ्या देशांत बसलेले लोकही परस्परांशी व्हर्च्युअली लाइव्ह जोडले जाऊ शकतात. तथापि, युजर्सकडे मेटाव्हर्सचे व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट, आग्युमेंटेड रिअॅलिटी ग्लास, हायटेक स्मार्टफोन यांसारखी उपकरणे असतील तरच हे शक्य आहे. एकूणच ही कम्युनिकेशनमधील पुढील क्रांती असेल, त्यात लोक आभासी आयुष्यही खऱ्या आयुष्याप्रमाणेच जगू शकतील.
ड्रेसपासून सजावटीपर्यंत सर्वकाही खऱ्या लग्नाप्रमाणे तयार केले
गेगनॉन दांपत्याने व्हायब्रेलाची इव्हेंट टीम आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरला फोटो पाठवले. त्यात ते लग्नासाठी तयार झाले होते. टीमने त्यांना आणखी शानदार बनवले. उदा. लग्नाचा ड्रेस, सजावट, सर्वकाही व्हर्च्युअली तयार केले. लग्न खरे वाटावे यासाठी पॅराडाइज फ्लॉवर्स, पक्षी व स्मरणीय स्थळेही तयार केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.