आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिको:गुन्हेगारीने त्रस्त महिलांचा संयम सुटला; पोलिसांवर हल्ला, हिंसाचार

मेक्सिकोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिकोत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन झाले. हे आंदोलन महिलांनी केले. राष्ट्रपती लोपेझ ओब्राडोर अत्याचारातील आरोपीचा बचाव करत आहेत. त्यामुळे देशात संताप आहे. ओब्राडोर यांनी पद सोडण्याच्या मागणीसाठी महिला सोमवारी राष्ट्रपती भवनास घेराव घालण्यासाठी निघाल्या. सुरक्षा दलाने रोखू नये म्हणून त्यांनी लायटर, लहान गॅस सिलिंडरसारख्या वस्तू, हातोडे, काठ्या आणल्या होत्या. पोलिसांनी रोखताच त्या संतापल्या. त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, जाळपोळ केली. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. ६२ पोलिसांसह ८१ महिला जखमी झाल्या.

रोज १० महिलांची हत्या : मेक्सिको त्या देशांपैकी एक आहे जेथे महिलांविरोधात सर्वाधिक गुन्हेगारी आहे. गेल्या वर्षीच येथे सरासरी रोज १० महिला मारल्या गेल्या, तर १६ हजारांवर अत्याचार झाले.

बातम्या आणखी आहेत...