आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोमध्ये हॉट-एअर बलूनला आग, VIDEO:जीव वाचवण्यासाठी 3 प्रवाशांनी उडत्या बलूनमधून उडी मारली, 2 जणांचा मृत्यू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिकोमध्ये एका हॉट-एअर बलूनला आग लागली. त्यानंतर त्यात स्वार असलेल्या 3 जणांनी उड्या मारल्या. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक मुलगा आगीत भाजला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बलूनला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या आगीत 39 वर्षीय महिला आणि 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचे मेक्सिकन सरकारने सांगितले. मुलाला सेकंड डिग्री बर्न झाली आहे. टियाटिहुआकनच्या पुरातत्व स्थळाजवळ ही घटना घडली. मात्र, घटनेच्या वेळी या फुग्यात किती लोक होते, याची माहिती समोर आलेली नाही.

बलून राईडसाठी 12 हजार रुपये मोजावे लागतात
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हॉट-एअर बलून प्रवाशांसोबत उडत असल्याचे दिसत आहे. थोड्याच वेळात, त्याच्या गंडोलाला आग लागते. यानंतर बलून बराच वेळ हवेत उडताना दिसतो. टियाटिहुआकान हे मेक्सिकोमधील एक अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे मेक्सिको सिटीपासून सुमारे 70 किमी अंतरावर आहे. येथे लोक सहसा 150 डॉलर्स (12 हजार 327 रुपये) मध्ये बलून राईडसाठी जातात.

ब्राझीलमध्ये पॅराशूटने विमानाला अपघात होण्यापासून वाचवले

काही दिवसांपूर्वी ब्राझीलमध्ये पॅराशूटच्या मदतीने एका छोट्या प्रवासी विमानाला अपघातातून वाचवण्यात आले होते. सिंगल इंजिन असलेल्या या विमानात 6 प्रवासी होते. हे सर्वजण सुखरूप उतरले. यामध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जागतिक दैनिक 'द नॅशनल'ने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 'सिरिस एअरफ्रेम पॅराशूट सिस्टिम' या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.