आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोत 53 बॅगेत मिळाले मानवी शरीराचे तुकडे:महिन्याभरापूर्वी कुत्रा कवटी तोंडात घेऊन जाताना दिसला होता, त्यानंतर तपासाला गती

मेक्सिको16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको शहरात पुन्हा एकदा अंगावर शहारे आणणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका माणसाचा कापलेला हात तोंडात धरून एक कुत्रा रस्त्याने धावत असल्याचा हा व्हिडिओ आहे.

दरम्यान, महिन्याभरातील मानवी शरीराचे अवयव घेऊन फिरणाऱ्या कुत्र्याची ही तिसरी घटना आहे. या सर्व प्रकरणामागे ड्रग माफिया असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

महिन्याभरापूर्वी समोर आला होता व्हिडिओ

यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात असाच एक कुत्रा तोंडात माणसाचे कवटी घेऊन पळताना दिसला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मानवी शरीराचे तुकडे असलेल्या 53 पिशव्या सापडल्या होत्या. दरम्यान, तपासात त्या व्यक्तीची ओळख होऊ शकली नव्हती. अजूनही पोलिसांना तपासात यश मिळालेले नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
27-28 ऑक्‍टोबरच्‍या सुमारास मेक्सिकोच्‍या झाकाटेकास शहरात प्रथमच शहरातील रहिवाशांना एक कुत्रा मानवी डोके तोंडात घेऊन फिरताना दिसला. लोकांनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुत्र्याचा शोध घेऊन त्याच्या तोंडातील मानवी कवटी बाहेर काढली होती. त्यानंतर तपासाला सुरूवात केली.

खुनाच्या ठिकाणाहून कुत्र्याने कवटी उचलली
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता या संपूर्ण प्रकरणामागे ड्रग्ज माफियांचा हात असल्याचे समोर आले. एका व्यक्तीचा खून करून एटीएमजवळ सोडण्यात आले. तेथे एक धमकीचे पत्रही सापडले. पुढचं डोकं तुमचं असेल असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. या एटीएमजवळून कुत्र्याने कवटी उचलली आणि ती खाण्यासाठी निर्जन जागा शोधू लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ तस्करांमध्ये सतत टोळीयुद्ध सुरू असते. या मारामारीत शहरात अनेक खुनाच्या घटना घडत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्रा ज्या ठिकाणाहून मानवी अवयव उचलतो आणि ते खाण्यासाठी निर्जनस जागा शोधतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्रा ज्या ठिकाणाहून मानवी अवयव उचलतो आणि ते खाण्यासाठी निर्जनस जागा शोधतो.

जानेवारीपासून 3000 लोक बेपत्ता
मेक्सिकोमध्ये अलीकडच्या काही महिन्यांत टोळी हिंसाचारात जवळपास 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मेक्सिकोच्या उत्तर-मध्य राज्य गुआनाजुआटोमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 2,400 हून अधिक हत्या झाल्या. यादरम्यान, सुमारे तीन हजार लोक बेपत्ता झालेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...