आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:न जन्मलेल्या बाळाच्या नाळेत प्रथमच आढळले ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण; प्लास्टिक बाटल्या, क्रीम, नेलपॉलिशमधील कण पोहोचले

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गर्भाची वाढ आणि बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होऊ शकतो सूक्ष्मकणांचा परिणाम

जन्मही न झालेल्या बाळाच्या नाळेत पहिल्यांदाच मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. त्याचे कण गर्भाच्या वाढीवर दुष्परिणाम करू शकतात, असे संशोधकांचे मत आहे. तसेच बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे भविष्यात आजारांशी लढण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते.

मायक्रोप्लास्टिकचे हे कण विषारी पदार्थांचे वाहक असू शकतात. यात पॅलेडियम, क्रोमियम, कॅडमियमसारख्या विषारी जड धातूंचा समावेश आहे. रोमचे फेटबेनेफ्राटेली रुग्णालय व पोलेटेक्निका डेल मार्श विद्यापीठानेे याबाबत संशोधन केले अहो. प्लास्टिकचे तुकडे १ ते ५ मायक्रॉनच्या सूक्ष्मकणांत रूपांतरित होतात त्याला मायक्रोप्लास्टिक म्हटले जाते. कपडे किंवा इतर वस्तूंचे मायक्रोफायबर तुटल्यानंतरही मायक्रोप्लास्टिक तयार होते.

प्लास्टिक बाटल्या, क्रीम, नेलपॉलिशमधील कण पोहोचले

१८ ते ४० वर्षे वयोगटातील ५ महिलांच्या प्लेसेंटाचे विश्लेषण झाले. चौघींत ५ ते १० मायक्रॉनचे १२ मायक्रोप्लास्टिकचे तुकडे मिळाले. हे कण आईचा श्वास व तोंडाद्वारे गर्भापर्यंत गेल्याचा अंदाज आहे. या १२ तुकड्यांपैकी ३ पॉलिप्रोपायलिन होते. ते प्लास्टिकची बाटली तयार करताना वापरले जाते. नऊमध्ये क्रीम, मेकअप किंवा नेलपॉलिशमध्ये वापरले जाणारे सिंथेटिक पेंट मटेरियल होते. हे कण डिंक, एअर फ्रेशनर, परफ्यूम व टूथपेस्टचेही असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली.

बातम्या आणखी आहेत...